संघभावनेतून शंभर प्रयोगांचा आनंदी प्रवास

संघभावनेतून शंभर प्रयोगांचा आनंदी प्रवास

Published on

पुणे, ता. १७ : ‘आख्यानाच्या प्रवासाला दीड वर्षापूर्वी सुरुवात झाली. आता शंभराव्या प्रयोगांपर्यंत येऊन पोहोचणे, हे स्वप्नवत आहे. पहिल्या प्रयोगापासून शंभराव्या प्रयोगापर्यंत सगळे कलाकार तेच आहेत, आमच्यातली संघभावना कायम आहे. त्यामुळे हा प्रवास एकत्रितपणे केल्याचा सर्वाधिक आनंद आहे’, अशी भावना ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमातील गायक आणि वादकांनी व्यक्त केली.
‘द फोक आख्याना’चा १००वा प्रयोग ७ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे हजारो रसिकांच्या उपस्थितीत सादर होत आहे. या भव्य शतकपूर्ती सोहळ्याचे आयोजन ‘सकाळ’ आणि ‘द फोक आख्यान’च्या चमूने केले आहे. ‘क्रेझी चीझी कॅफे’ हे या कार्यक्रमाचे ‘फूड पार्टनर’ असून सूर्यकांत काकडे फार्म हे ‘व्हेन्यू पार्टनर’ आहेत. या प्रयोगानिमित्त आख्यानातील कलाकारांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. या वेळी त्यांनी आख्यानाचा प्रवास, सादरीकरणाचा अनुभव, रसिकांची भावना व्यक्त केली.
गायिका ऋचा कुलकर्णी म्हणाली की, ‘खरेतर १००व्या प्रयोगापर्यंत कधी पोहचलो, हे कळलेच नाही. प्रत्येक टप्प्यावरची रसिकांची दाद आजही स्मरणात आहे. तितकीच जबाबदारीही वाढत आहे. या प्रवासात आम्ही कलाकार म्हणून खूप समृद्ध झालो. प्रत्येकाची कलेची समज वाढली आहे.’
गायिका अनुजा देवरे म्हणाली की, ‘एका कार्यक्रमात माझी आणि हर्ष-विजय यांच्यातील विजय दादाची माझी भेट झाली. तेव्हापासून एकत्र काम करूयात, असे तो म्हणत होता. ‘द फोक आख्यान’ची संकल्पना नक्की झाल्यावर त्याने लगेच मला बोलावले आणि मी या आख्यानाचा भाग झाले. या कमाल टीमसोबत काम करण्याचा अनुभव अद्भूत आहे.’

तिकिटे येथे उपलब्ध
‘द फोक आख्यान’ या कार्यक्रमाची तिकिटे ticketkhidakee.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत या कार्यक्रमाची तिकिटे उपलब्ध असतील. अथवा ९६०२०२७६७६ या क्रमांकावर फोन करूनही तिकिटे आरक्षित करता येतील.

रसिकांनी फोक आख्यानावर भरभरून प्रेम केले आहे, अजूनही करत आहेत. आख्यानामुळे माझेही भले झाले. दिल्ली, दुबईसारख्या ठिकाणी मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम ‘हाऊसफुल्ल’ होणे, यासारखी मोठी गोष्ट नाही.
- शाहीर चंद्रकांत माने, गायक

गाण्याचा कोणताही प्रकार असला तरी शास्त्रीय संगीत हा त्याचा पाया आहे. कार्यक्रमाच्या एक-दोन दिवसांपूर्वी, कार्यक्रमापूर्वी आमचा नियमित रियाज होतो. माझ्या वडिलांचा लोकसंगीताचा वारसा या कार्यक्रमामुळे पुढे चालवता येत असल्याचे मला समाधान आहे.
- ऋषिकेश रिकामे, गायक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com