
स्वामिनी सावरकर यांचे निधन
पुणे ः सामाजिक कार्यकर्त्या स्वामिनी सावरकर (वय ८४) यांचे मंगळवारी उपचारादरम्यान येथे निधन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या त्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रमराव सावरकर यांच्या व्रतस्थ जीवनाला खंबीरपणे साथ देणाऱ्या स्वामिनी सावरकर या अखेरपर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. स्वामिनी यांनी पती विक्रम सावरकर यांच्यासोबत ‘प्रज्वलंत’ नावाच्या वृत्तपत्राचे काम सांभाळले. यासोबतच मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे कामही त्या पाहत. सामाजिक कार्य, संपादन कार्य यासह विविध क्षेत्रात त्यांनी काम पाहिले आहे.
--------------------
फोटो------३२००३