अभ्यंग व मसाज व्यावसायिक कार्यशाळा

अभ्यंग व मसाज व्यावसायिक कार्यशाळा
Published on

अभ्यंग व मसाज व्यावसायिक कार्यशाळा
आयुर्वेदिक अभ्यंग व मसाज उपचारांनी संधिवात, डोकेदुखी, मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, हृदयासंबंधी आजार, त्वचेचे आजार, पचनासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला लोकप्रियता लाभली आहे. तज्ज्ञ व्यावसायिकांची गरज असणारी ही उपचार पद्धती शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, याबाबत व्यावसायिक दृष्टीतून मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा ६, ७ व ८ डिसेंबर या कालावधीत आयोजिली आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी किती वेळ करावा, कधी करू नये, याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन होणार आहे. या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. कांत कार्यशाळेत शिकवणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४

यू ट्युब कन्टेन्ट क्रिएटर होण्याची संधी
यू ट्युब हे माध्यम सर्जनशीलतेला मुक्त वाव देणारे व आवडीचे काम इतरांपर्यंत पोहोचवणारे क्षेत्र आहे. अर्ध-वेळ किंवा पूर्ण-वेळ यू ट्युबर हे या काळात कौशल्याधारित युवकांसाठी उपलब्ध असलेला एक चांगला व्यवसाय आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक शिवाजी कचरे यांची ‘यू ट्युब सामग्री निर्माता’ ही चार दिवसांची कार्यशाळा ७, ८ व १४, १५ डिसेंबर या कालावधीत आयोजिली आहे. ज्यांना यू ट्युब व इतर माध्यमांद्वारे सामग्री निर्माता व्हायचे आहे अथवा जे आधीच असे निर्माते आहेत त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे, अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. यू ट्युबद्वारे कमाई कशी करता येते, याबद्दलची संपूर्ण माहिती, स्वतःचे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, याचे उपयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com