प्रात्यक्षिकांद्वारे शिका व्यावसायिक मसाले

प्रात्यक्षिकांद्वारे शिका व्यावसायिक मसाले

Published on

प्रात्यक्षिकांद्वारे शिका व्यावसायिक मसाले
गरम मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, चाट मसाला, मिसळ मसाला, चहा मसाला, गोडा मसाला, कोल्हापुरी कांदा- लसूण चटणी, काळा मसाला इ. घरगुती चवीचे, झणझणीत कोल्हापुरी मसाले कसे तयार करावेत, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय प्रशिक्षण शनिवारी (ता. ७) व रविवारी (ता. ८) होणार आहे. यात व्यावसायिकदृष्टीने मसाले कसे तयार करावेत, मसाला व्यवसायाची सुरुवात कशी करावी, पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग कसे करावे, याबाबत मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा पूर्ण झाल्यास सर्व मसाला रेसीपींच्या पीडीएफ नोट्सही पुरवल्या जातील.
संपर्क : ८४८४८११५४४
................
व्यावसायिक मिलेट्स प्रक्रिया कार्यशाळा
आहार व आरोग्यविषयक जागरूकता वाढल्याने भरडधान्ये (मिलेट्स) आता ताटात दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भरडधान्यांवर प्रक्रिया करून विविध नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १४ व १५ डिसेंबर रोजी होणार आहे. कार्यशाळेत मिलेट्स म्हणजे काय, महत्त्व, उपयुक्तता, गरज व मागणी, पोषक गुणधर्म याबाबत माहिती दिली जाणार आहे. पराठा, उपमा, लापशी, खीर, पीठ, लाडू, नमकीन, पुलाव, इडली, डोसा, कुकीज, ढोकळा, स्वीट व बर्फी, प्रोटीन पावडर, चिवडा इत्यादी मिलेट्सचे विविध पदार्थ शिकवण्यात येतील. पॅकिंग, ब्रॅण्डिंग, लागणारी मशिनरी, प्रकल्प, उत्पादन व बाजार खर्च, विक्रीच्या पद्धती आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
.....................
शेतकरी उत्पादक कंपनी प्रशिक्षण वर्ग
शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (मुख्य कार्यकारी व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, व्यवसाय नियोजन करणे, बाजार नियोजन करणे, मनुष्यबळ व्यवस्थापन करणे, अशी जबाबदारी या पदावर असते. या पार्श्वभूमीवर १४ डिसेंबरपासून पाच दिवसांचे प्रशिक्षण आयोजिले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, शेतकरी कंपनी संचालक, तसेच शेतकरी कंपनी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१, ९३०७६४९०४७
..............
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश ‘महारेरा’ने दिला आहे. ‘महारेरा’ने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन तुकडी ९ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com