राज्यातील २६ ‘आयटीआय’चे नाव बदलण्यास मान्यता

राज्यातील २६ ‘आयटीआय’चे 
नाव बदलण्यास मान्यता
Published on

पुणे, ता. ४ : राज्यातील २६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) नावात बदल करण्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील तीन आयटीआयचा समावेश आहे. या नव्या निर्णयानुसार औंध येथील शासकीय आयटीआय आता ‘छत्रपती शिवाजी महाराज, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ या नव्या नावाने, तर याच प्रांगणात असणारी मुलींची शासकीय आयटीआय ‘सावित्रीबाई फुले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला)’ या नावाने ओळखली जाणार आहे.

राज्यात शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे आणि खासगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे, असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सद्यःस्थितीत राज्यात ४१९ शासकीय आणि ५८५ खासगी आयटीआय कार्यरत आहेत. राज्यातील २६ शासकीय आयटीआय संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या ३० सप्टेंबरला झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील २६ शासकीय आयटीआय संस्थांचे नाव बदलण्यात आले आहे. बारामतीतील माळेगाव (बुद्रूक) येथे असणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आता ‘अनंतराव पवार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ हे नाव दिले आहे.

राज्यातील काही शासकीय आयटीआयच्या नावात बदल करण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून नामकरणासाठी नावे मागविली होती. औंध येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ‘सावित्रीबाई फुले’ यांचे नाव दिले आहे. या नावाने संस्थेच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
- आय. आर. भिलेगावकर,
प्राचार्य, शासकीय आयटीआय (मुलींची), औंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com