‘सीओईपी’च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विनायक पै

‘सीओईपी’च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विनायक पै

Published on

पुणे, ता. ९ : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्राज इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष प्रमोद चौधरी यांची जून २०२३मध्ये विद्यापीठाच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त केली होती; मात्र काही आठवड्यांपूर्वी चौधरी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त होते. आता या पदावर पै यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने पै यांच्या नियुक्तीचा अध्यादेश नुकताच काढला आहे. पै हे ‘सीओईपी’चे माजी विद्यार्थी असून सध्या ते टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कारकीर्द घडवली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड म्हणाले, ‘‘पै यांची शिक्षण, नवोन्मेषण आणि राष्ट्र उभारणीबाबतची बांधिलकी विद्यापीठाच्या पुढील वाटचालीचे नेतृत्व करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांचा दृष्टिकोन आणि अनुभव आम्हाला शिक्षण, संशोधन आणि उद्योगांसमवेत सहयोग यात नवीन शिखरांवर पोहोचण्यात उपयुक्त ठरेल. पै यांच्या नेतृत्वामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि स्तर आणखीन उंचावणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com