सकाळ कनेक्ट

सकाळ कनेक्ट
Published on

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
‘यूडीसीपीआर’ नियमामुळे राज्यातील मोठ्या शहरांमध्ये जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे, त्यामुळे ‘एफएसआय’ कसा व किती वाढला, त्याचा वापर कसा करायचा, फिसिबिलिटी रिपोर्ट कशासाठी काढतात, पीएमसी म्हणजे काय आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १ मेच्या दिवशी आयोजित केली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्द्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रीडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे, असे सर्वजण व रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
----------------------------------------------------
स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन प्रशिक्षण
रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करण्याच्या क्षेत्रात यायचा विचार करीत असणाऱ्यांसाठी किंवा या क्षेत्रात काम करीत आहे, परंतु सुयोग्य पद्धत माहीत नाही, अशांसाठी उपयुक्त ५ ते १८ मेदरम्यान प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करून रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. प्रशिक्षण ऑनलाइन दोन आठवडे व एक दिवस प्रात्यक्षिक, अशा स्वरूपात होणार आहे. सिव्हिल इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स व विद्यार्थी यांच्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
----------------------------------------------------
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्‍वस्त संस्था, देवस्थाने आता ई-टेंडर प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण ५ व ६ मे रोजी आयोजित केले आहे. प्रशिक्षणात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणारे टेंडरसुद्धा कसे शोधायचे, ‘बीओक्यू’ भरताना येणाऱ्या अडचणी, टेंडरला लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे मशिनरी नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या, याबाबत व इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com