‘महारेरा’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र सर्व स्थावर संपदा अभिकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातील विकसकांकडे स्थावर संपदा व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य झाले आहे. यासाठी ‘महारेरा’ मान्यताप्राप्त संस्थेमार्फत होणारे २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे व ‘आयबीपीएस’तर्फे होणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल १५ एप्रिल रोजी चालू झाले आहे. १४ मे रोजी हे पोर्टल बंद होणार असल्याने त्यापूर्वी एजंटचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. पोर्टल बंद होण्यापूर्वीचे पुढील प्रशिक्षण सोमवारपासून (ता. १२) सुरू होणार आहे. डिसेंबर २०२४ नंतर २०२५ या वर्षात प्रथमच पोर्टल खुले झाले असून पुढे लवकर पोर्टल खुले होण्याची शक्यता कमी असल्याने प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेस सामोरे जाण्याची ही शेवटची संधी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
‘भूजल अॅप’ ऑनलाइन कार्यशाळा
भारत सरकारनेही दखल घेतलेले ‘भूजल अॅप’ हे मोबाईल अॅप अवघ्या मिनिटभरामध्ये बोअरवेलमधील भूजल पातळी मोजू शकते. यासाठी बोअरला कोणतेही यंत्र जोडण्याची गरज नाही किंवा बोअर उघडावे लागत नाही. या अॅपचा वापर कसा करायचा, त्याचा भूजल व्यवस्थापनासह शेतीची जलसुरक्षा निश्चितीसाठी कसा लाभ होतो, हे जाणून घेण्यासाठी १७ मे रोजी ऑनलाइन कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये पाणी शाश्वतपणे कसे वापरावे, उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळून पीक कसे वाचवावे, उत्पादन वाढवण्यासाठी पाण्याचा योग्य उपयोग कसा करावा, वीज व पाण्याची बचत करून खर्च कसा कमी करावा आणि जनावरांसाठी किंवा आपत्कालीन गरजेसाठी पाणी कसे राखून ठेवावे, याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. शेतात बोअरवेलचा वापर करणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ९१५६०१०००६
हाउसिंग सोसायटी मॅनेजर प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण ‘एसआयआयएलसी’ आणि पुणे हाउसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६, ७ व ८ जून रोजी आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.