पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 
रविवारी खास कार्यशाळा

पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रविवारी खास कार्यशाळा

Published on

पदवीधरांसाठी कार्यशाळा

पुणे, ता. ७ : पदवी मिळाली, पुढे काय करायचं, कोणते शिक्षण घ्यायचे? हा कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्यांच्या मनात येणारा प्रश्न. परंतु अनेकांच्या करिअरबाबत वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा विचार असतो. ते स्वतःला व्यावसायिक म्हणून घडवू इच्छितात किंवा चांगल्या नोकरीसाठी स्वतःला अपग्रेड करू पाहतात. असा विचार करणाऱ्या सर्व पदवीधरांसाठी (२१ ते २६ वयोगट) खास कार्यशाळा रविवारी (ता. १२) ‘सकाळ-ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ने आयोजिली आहे. यंदा पदवीधर झालेल्या किंवा दोन वर्षांत पदवीधर होऊन करिअरबाबत वेगळा विचार करणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजिली आहे. कारण, पदवी होईपर्यंत आपण करिअरबाबत खरंच गंभीर होतो का? नुसत्या प्रमाणपत्रावर चांगली नोकरी मिळत नाही. घरच्यांची अपेक्षा असते की मुलांनी काहीतरी शिकावे, जिथे त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळेल आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. अशा विचारात व करिअरच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोफत कार्यशाळा अवश्य आहे.

व्यावसायिक होण्यासाठी
पदवीनंतर अनेकजण नाइलाजास्तव नोकरी करतात. परंतु त्यांचे मन नोकरीत रमत नाही. अनेकांना वाटतं की, काहीतरी व्यवसाय करावा, पण त्याची सुरूवात कोठून करावी? याविषयी संभ्रम असतो. व्यवसाय चालवायचा कसा, तो यशस्वी करण्याचे मार्गदर्शन कुठे मिळेल, व्यावसायिक होण्यासाठी नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, सादरीकरण, मार्केटिंगची माहिती, बाजारपेठेचा अभ्यास, निर्णय क्षमता अवगत असाव्या लागतात. या सर्व गोष्टींवर कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.

संपर्क : ९८८१०९९७५७ किंवा ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com