

सतीश मराठेंच्या अमृतमहोत्सवाचे आज मुंबईत आयोजन
मुंबई, ता. १८ : सहकार क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, सहकारी बँक क्षेत्राला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे, सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यंदा वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे आयोजन बुधवारी (ता. १९) मुंबईत होणार आहे.
दादर पूर्व येथील श्री स्वामी नारायण मंदिर सभागृहात अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता सोहळ्यास सुरुवात होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी प्रमुख पाहुणे असतील, तर इफ्कोचे प्रबंध संचालक उदय शंकर अवस्थी आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू विशेष निमंत्रित वक्ते असतील, अशी माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी दिली.
सतीश मराठे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोजन समितीचे सुरेश प्रभू हे अध्यक्ष आहेत, असे सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव दीपक कुमार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.