मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा न्यूझीलंडमध्ये विस्तार

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा न्यूझीलंडमध्ये विस्तार

Published on

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा न्यूझीलंडमध्ये विस्तार
पुणे, ता. १८ : विविध १३ देशांमध्ये ३७५ हून अधिक शोरूम व दागिन्यांच्या विक्रीत जगात सहाव्या क्रमांकावर असलेल्या ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’ने आणखी पाऊल पुढे टाकले आहे. यूएई आणि न्यूझीलंड यांनी उभयतांमधील व्यापार संबंध आणि आर्थिक सहकार्याच्या मजबुतीसाठी स्वाक्षरी केलेल्या ‘कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप करार’मुळे (सेपा) मलाबार ब्रँडचा आता चौदाव्या देशात म्हणजेच न्यूझीलंडमध्येही विस्तार होणार आहे. तेथे मलाबार गोल्ड तीन शोरूमसाठी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक पहिल्या टप्प्यात करणार आहे.

या करारामुळे केवळ आमचे आर्थिक संबंधच मजबूत होणार नाहीत तर आमच्या उत्पादनांसह आणि सेवांद्वारे नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. जगातील पहिल्या क्रमांकाचा ज्वेलरी रिटेलर बनण्याच्या ध्येयाकडे मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आणखी एक पाऊल टाकत आहे. त्यामुळे आमच्या ब्रँडच्या दुर्मिळ दागिन्यांचा समृद्ध संग्रह आणि प्रसिद्ध कारागिरी न्यूझीलंडच्या ग्राहकांसाठी खुली होईल, असे मलाबार समूहाचे अध्यक्ष एमपी अहमद यांनी सांगितले. या वेळी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक श्यामलाल अहमद, न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले, संयुक्त अरब अमिरातीमध्ये न्यूझीलंडचे व्यापार उच्चायुक्त, दुबई आणि उत्तर अमिरातीचे वाणिज्यदूत अहमद झक्कौत, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या व्यवसाय विकास प्रमुख सीतारामण वरदराजन आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com