वारसा, राष्ट्रहिताशिवाय विकास अशक्य

वारसा, राष्ट्रहिताशिवाय विकास अशक्य

Published on

वारसा, राष्ट्रहिताशिवाय विकास अशक्य
देवेंद्र फडणवीस : शिवसृष्टीच्या द्वितीय चरणाचे लोकार्पण, ५० कोटींचा नि

पुणे, ता. १९ : आपल्याला समृद्ध इतिहास होता; पण तो वारसा विसरल्याने आपण गुलामगिरीत गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढले. जोपर्यंत वारसा आणि राष्‍ट्रहित लक्षात येत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. शिवसृष्टीच्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास नवीन पिढीसमोर आणता येईल. पुढील कामासाठी राज्य सरकारतर्फे ५० कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या द्वितीय चरणाचा लोकार्पण समारंभ बुधवारी (ता. १९) शिवजयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, आमदार विजय शिवतारे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्‍वस्त जगदीश कदम, अमृत पुरंदरे, विनीत कुबेर, डॉ. विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेली शिवसृष्टी पाहून मी नि:शब्द झालो. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघेही महाराजांचे मावळे असल्याने शिवसृष्टीचे उर्वरित टप्पे पूर्ण व्हावे, अशी आमची इच्छा आहे. भाषेचे महत्त्व महाराजांनी जाणले होते. त्यामुळेच त्यांनी त्या काळी स्वराज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन अरबी, फारसी भाषांऐवजी मराठीतूनच राज्यकारभार चालू केला होता. या वेळी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कदम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अजित आपटे यांनी सूत्रसंचालन केले. कुबेर यांनी आभार मानले.

‘अभ्यासाचे प्रेरणा केंद्र’
महाराजांचे अनेक पैलू पुढे आणण्याचे काम शिवसृष्टी करेल. हे केवळ पर्यटन केंद्र नसून, शिवरायांवरील अभ्यासाचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्याचे केंद्र आहे, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले...
- पंतप्रधानांनी ‘विकास भी, विरासत भी’ संकल्पना देशासमोर मांडली
- वारसा, विरासत जपणारी राष्ट्राभिमानी पिढी निर्माण होण्यासाठी शिवसृष्टी महत्त्वाची
- शिवसृष्टीत जो विचार व प्रेरणा मिळाली, ती शब्दांत वर्णन करता येणार नाही
- शालेय विद्यार्थ्यांनी शिवसृष्टीला अवश्य भेट द्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com