लग्नासाठी कुंडली पाहणे समज, गैरसमज आणि उपयोग

लग्नासाठी कुंडली पाहणे समज, गैरसमज आणि उपयोग

Published on

लग्नासाठी कुंडली पाहणे समज, गैरसमज आणि उपयोग
पत्रिका वा कुंडली कशी जुळवावी, पत्रिका पाहण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत शंका-समाधानासह माहिती देणारी दोन तासांची कार्यशाळा १५ जून रोजी आयोजिली आहे. एक नाडी असल्यास पत्रिका जुळत नाही, ३६ गुण असल्यास विवाह करू नये, मंगळाच्या पत्रिकेस मंगळाचाच जोडीदार लागतो, मृत्युषडाष्टक असू नये, १८ पेक्षा कमी गुण चालत नाहीत या व अशा अनेक प्रचलित बाबी अंधश्रद्धा कशा आहेत तसेच दाते पंचांगातील तीन कोष्टके संदर्भात घेऊन निर्णय कसे घ्यावेत याबाबत शास्त्रशुद्ध माहिती कार्यशाळेत मिळणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

पॅकेजिंग तंत्रज्ञान उद्योग कार्यशाळा
पॅकेजिंग मटेरिअल कसे तयार करतात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल आदींविषयी सविस्तर माहिती करून देणारा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम १४ जूनपासून सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, विविध प्रकारच्या मटेरिअलची ओळख, लागणारी यंत्रे, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी आदीविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट अप करायचे आहे, तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे आदींसाठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

ड्रोन सर्व्हे आणि डेटा प्रोसेसिंग प्रशिक्षण
डिजिटल युगात सर्वेक्षणाचे तंत्र झपाट्याने बदलत आहे आणि ड्रोन तंत्रज्ञान त्यात मोठी क्रांती घडवत आहे. स्थापत्य अभियंते, GIS तज्ज्ञ आणि सरकारी प्रकल्पांवर काम करणाऱ्या कंत्राटदारांसाठी खास तयार करण्यात आलेले पाच दिवसांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण १५ जूनपासून सुरू होत आहे. दर रविवारी होणाऱ्या या प्रशिक्षणात DGCA नियमांपासून फोटो ग्रामेट्री, डेटा प्रोसेसिंग आणि फायनल रिपोर्टिंगपर्यंत सर्व गोष्टी शिकवण्यात येतील. Fixed-wing ते Multirotor ड्रोन, मिशन प्लॅनिंग, GCP वापरून डेटा कॅप्चर, GIS/AutoCAD इंटिग्रेशन इत्यादी प्रात्यक्षिक पद्धतीने शिकण्याची संधी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

महाराष्ट्र जमीन व महसूल प्रमाणपत्र कार्यशाळा
शेतजमिनीचा ७-१२, फेरफार, गाव नकाशा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी-विक्रीचे नियम, कायदेशीर आव्हाने आणि उपाय तसेच जमिनीसाठी महारेरा आदी विषयांवर मार्गदर्शन करणारा महाराष्ट्र जमीन व महसूल प्रमाणपत्र कार्यशाळा २८ जून रोजी आयोजिली आहे. सर्व महत्त्वाच्या विषयांचा समावेश असलेला हा सर्वात व्यापक कार्यक्रम आहे. यात अनुभवी उद्योग व्यवसायींकडून मार्गदर्शन होणार आहे. तसेच काही महत्त्वाच्या सत्रांमध्ये नामांकित उद्योग नेत्यांकडून मार्गदर्शन होणार आहे. ही कार्यशाळा करिअरच्या हेतूनेदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. याद्वारे व्यावसायिक जगात त्वरित ओळख निर्माण करणे शक्य आहे. केस स्टडी तसेच शंका-समाधान यांचाही कार्यशाळेत समावेश आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ९५०३६५५२७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com