

पुणे, ता. १६ : आजच्या धावपळीच्या जीवनात लोक फिटनेस, वजन कमी करणे, मसल बिल्डिंग, आहार नियंत्रण, लाइफस्टाइल डिसऑर्डर कंट्रोल (जसे डायबिटीज, बीपी) याकडे अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळे फिटनेस आणि न्युट्रिशन ट्रेनर्सला शहरी तसेच निमशहरी भागांतही वाढती मागणी आहे. आज अनेक लोक जिममध्ये वैयक्तिक ट्रेनर घेतात. घरून वर्कआउटसाठी ऑनलाइन ट्रेनर शोधतात, तर वजन कमी करण्यासाठी डायट प्लॅनर घेतात. त्यामुळे हा एक प्रगत आणि कमाईचा चांगला पर्याय बनत आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारे तीन महिन्यांचे ऑफलाइन-ऑनलाइन चालणारे खास प्रशिक्षण ‘सकाळ माध्यम समूहा’च्या कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसीतर्फे आयोजित केले आहे.
सर्टिफाइड फिटनेस आणि न्युट्रिशन ट्रेनर होऊन पर्सनल फिटनेस ट्रेनर, जिम/फिटनेस क्लब ट्रेनर, ऑनलाइन कोचिंग, कॉर्पोरेट फिटनेस ट्रेनर, स्पोर्टस न्युट्रिशनिस्ट, फिटनेस इन्फ्लुएन्सर-सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे, फ्रीलान्स डायट प्लॅनर-डायट कन्सल्टिंग इत्यादीमध्ये वाव मिळू शकतो. सुरुवातीला कमी संसाधनातून (मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेट) ऑनलाइन सेवा सुरू करता येते, तसेच अनुभव वाढल्यानंतर स्वत:चा ब्रँड किंवा फिटनेस स्टुडिओ सुरू करता येतो. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क ः ९८८१०९९४२६ किंवा ८४८४८२२१६६
प्रशिक्षणात शिका ‘ही’ कौशल्ये
१) फिटनेस व न्युट्रिशनचे सखोल ज्ञान ः शरीररचना, वर्कआउट प्रकार, आहार प्रकार, सप्लिमेंट्स, बीएमआय इत्यादी
२) संवाद कौशल्ये ः ग्राहकाला समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करणे
३) मोटिव्हेशन आणि समर्पण ः ग्राहकाला प्रेरित ठेवणे आणि सातत्याने मार्गदर्शन करणे
४) वैयक्तिक आहार व व्यायाम योजना बनवण्याची क्षमता
५) डिजिटल कौशल्ये ः व्हिडिओ कॉल ट्रेनिंग, सोशल मीडिया प्रमोशन, डायट प्लॅन ॲप्स वापरणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.