मुलांसाठी थ्री-डी प्रिंटिंग
तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन

मुलांसाठी थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन

Published on

मुलांसाठी थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन
पुणे, ता. १२ : मुलांच्या कलात्मक क्षमतेला नवीन आयाम देण्यासाठी १६ व १७ ऑगस्टला थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजिली आहे. यात मुलांना थ्री डी प्रिंटिंगची मूलतत्त्वे, एफडीएम प्रिंटरची कामे आणि सुरक्षित वापर याची ओळख, थिंकरकॅडसारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिजिटल मॉडेल डिझाइन करणे, टॅग, बबल वँड, लिथोफेन चित्र यांसारखी मूळ वस्तू तयार करून स्वतःची मुद्रित वस्तू घेऊन जाण्याची मजा, प्रिंटिंग नियोजन, सलाईसिंग, ट्रबलशूटिंग व पोस्ट-प्रोसेसिंगची कौशल्ये आदी बाबींची मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रात्यक्षिकांसहीत माहिती दिली जाणार आहे. ही कार्यशाळा इंटरॅक्टिव्ह असणार आहे. प्रत्येक सहभागी व्यक्तीस प्रिंट केलेले मॉडेल मिळणार आहे. कार्यशाळा ६ ते १४ वर्षे वयोगटांतील मुलांसाठी योग्य आहे. मुलांमध्ये तंत्रज्ञान, डिझाइन, शैक्षणिक व वैज्ञानिक आवड विकसित करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इ.बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १८ ऑगस्टपासून आयोजिली आहे. घर वास्तू दोषमुक्त असावी ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा-उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तूपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तूचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

‘लीव्ह अँड लायसन्स’ मास्टरक्लास
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. या प्रक्रियेतून मालकाचे हक्क सुरक्षित राहतात आणि भाडेकरूस तात्पुरते निवास किंवा व्यावसायिक वापराचे अधिकार मिळतात, मात्र योग्य करारनामा तयार करणे, कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्यूटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया, तसेच पोलिसांना कळविणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास २५ ऑगस्टला आयोजिला आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाणार आहे. तसेच, ११ महिन्यांच्या कराराची नोंदणी बंधनकारक का आहे, कोणती कागदपत्रे लागतात, पोलिस इंटिमेशनचे महत्त्व आणि सरकारमान्य स्वरूपांचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे. घरमालक, रिअल इस्टेट एजंट, वकील, बिल्डर तसेच अतिरिक्त उत्पन्न कमावू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ३१ ऑगस्टला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रीडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंटांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com