पौष्टिक लाडू व्यावसायिक कार्यशाळा
पौष्टिक लाडू व्यावसायिक कार्यशाळा
महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये लाडूला अगदी महत्त्वाचे स्थान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू व त्याचे विविध ऋतुमानानुसार शरीरासाठी असणारे महत्त्व या अनुषंगाने विविध प्रकारचे लाडू तयार करण्यास शिकवणारी व्यावसायिक कार्यशाळा १३ डिसेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत खजूर, डिंक, जवस, सातू, ड्रायफ्रूट, बाजरी, पौष्टिक, राघवदास, मेथी, गुलकंद, पान, चॉकलेट, राजगिरा, चिरमुरा, नाचणी, मिलेट, उपवासाचा स्पेशल, रवा, बेसन, बनाना, पांचाली व मूग हे नावीन्यपूर्ण लाडूचे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवले जातील. त्याचप्रमाणे अगदी कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करता येतो याचे मार्गदर्शन केले जाईल. तसेच मार्केटिंग, पॅकिंग, लायसनिंग, कॉस्टिंग याच्या नोट्स पुरवल्या जातील.
इन्स्टंट पीठे व इन्स्टंट प्रिमिक्स
सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड प्रिमिक्स तयार करण्यास शिकवणारी कार्यशाळा १४ डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये डोसा प्रिमिक्स, इडली प्रिमिक्स, आइस्क्रीम प्रिमिक्स, गुलाबजामुन प्रिमिक्स, पोहे प्रिमिक्स, उपमा प्रिमिक्स, पराठा प्रिमिक्स, थालीपीठ प्रिमिक्स, ढोकळा प्रिमिक्स, पकोडा प्रिमिक्स, दाल खिचडी प्रिमिक्स, पुलाव प्रिमिक्स, सरबत प्रिमिक्स, मिल्कशेक प्रिमिक्स, केक प्रिमिक्स, मल्टिग्रेन पराठा प्रिमिक्स, खीर प्रिमिक्स, रबडी प्रिमिक्स हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी इ.विषयी मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यास नोट्स व डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
शंखसाधना कार्यशाळा
भारतीय संस्कृतीमध्ये शंख व त्याच्या ध्वनीला पावित्र्य आहे. ही एक खूप प्राचीन साधना आहे. शंखसाधनेद्वारे श्वासोच्छ्वास लांब होतात व दम्यासारखे श्वसनाचे व थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांनी नियमित शंखसाधना केल्यास धूम्रपानाचे व्यसन दूर होते. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंखसाधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. मुली आणि महिलाही ही साधना करू शकतात. या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी शंखसाधनेविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शंख व सनातन धर्म, शंखाचे प्रकार, शंखाची नैसर्गिक निर्मिती, शंख नाद, शरीर व योग यांची माहिती व शंख नादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे.
औषधी वनस्पती लागवड ऑनलाइन कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षांत औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २२ डिसेंबर रोजी आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

