जोयआलुक्कास

जोयआलुक्कास

Published on

पुणे, ता. ४ ः जोयआलुक्कास ज्वेलर्सच्या ‘द बिगेस्ट ज्वेलरी सेल ऑफ द इयर’मध्ये ग्राहकांना दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सूट मिळत असून, १३ जुलै ही या सेलची अंतिम तारीख आहे.

या सेलमध्ये सोने, हिरे (कट आणि अनकट), प्लॅटिनम, चांदी आणि मौल्यवान खड्यांमध्ये जडविलेल्या उत्कृष्ट डिझाइनच्या दागिन्यांचा समावेश असून, पारंपरिक कलात्मकता आणि आधुनिकतेचा संगम करणारे दहा लाखांहून अधिक हस्तकला नमुने उपलब्ध आहेत. या सवलतीसोबत, ग्राहकांना दागिन्यांची मोफत आजीवन देखभाल, एक वर्षाचा मोफत विमा व प्रत्येक खरेदीवर शंभर टक्के बायबँक हमीचा फायदा मिळणार आहे.
याबाबत जोयआलुक्कास समूहाचे अध्यक्ष डॉ. जोय आलुक्कास म्हणाले, ‘‘या वर्षीच्या सेलला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत. आमच्या शोरूममध्ये ग्राहकांना अभिजात दागिन्यांची चोखंदळ निवड करताना पाहून आनंद झाला. फक्त काही दिवस शिल्लक असताना, आम्ही सर्वांना त्यांच्या जवळच्या शोरूमला भेट देण्याचे आणि ही ऑफर संपण्यापूर्वी त्याचा लाभ घेण्याचे आमंत्रण देत आहोत.’’
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com