अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षण
अन्नप्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षण
अन्नप्रक्रिया उद्योग हे क्षेत्र उत्पादन, खप, रोजगार आणि निर्यात या दृष्टीने मोठे क्षेत्र आहे. उद्योगातील इतर क्षेत्रांपेक्षा नफ्याचे प्रमाणही अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये जास्त आहे. यासंबंधी मार्गदर्शन करणारे तीनदिवसीय प्रशिक्षण १२, १३ व १४ जुलै रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात उद्योग व स्टार्टअप स्थापना, ब्रॅण्डिंग, विक्री व प्रसार, निर्यात उद्योगातील संधी, शासकीय योजना, अनुदान, कागदपत्रे, अन्नप्रक्रिया उद्योग व्यवस्थापन, बँक कर्जे व अनुदान इत्यादी बाबींवर मार्गदर्शन तसेच लहान, मध्यम व मोठ्या अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रत्यक्ष भेट, फळे, लोणचे व मसाले यांचे अन्नप्रक्रिया प्रात्यक्षिक होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
किचन गार्डन कार्यशाळा
किचन गार्डनद्वारे भाजीपाला, सक्युलन्ट्स व कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडांची तसेच इतर फळझाडांची लागवड करता येते. रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला व शोभेची इतर झाडे घरच्या घरी कशी लाऊ शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ जुलै रोजी आयोजिली आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, शिवाय वर्षभर बाग फुललेली कशी राखावी, बागेचे आर्थिक गणित कसे बसवावे, बागेचे नियोजन व डिझाईन, लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, रोपांची निवड, माती व मातीविरहित लागवड करण्याची पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण याविषयी माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणारे अनुभवी तज्ज्ञ कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
एफपीसी लेखा प्रशिक्षण कार्यशाळा
शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) चालवणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी एफपीसीसाठी लेखा नोंदी व मूलभूत लेखा या विषयावर एकदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा १६ जुलै रोजी आयोजिली आहे. प्रशिक्षणामध्ये एफपीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल, संचालक मंडळ सदस्य व सहाय्यक कर्मचारी सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेत संस्थेमध्ये ठेवावयाच्या आवश्यक नोंदी, लेखा व्यवहारांची नोंद कशी करावी, आर्थिक ताळेबंद, वजावट कर (टीडीएस), वस्तू व सेवा कर (जीएसटी), कंपनी नोंदणी कार्यालयाकडे सादर करावयाचे अहवाल (आरओसी) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. सहभागी सदस्यांच्या सोयीसाठी रोख व बँक वही, खरेदी-विक्री नोंदवही, साठा नोंदवही यांचे नमुने व आराखडे सादर करण्यात येणार असून, पारदर्शक व परिणामकारक लेखा व्यवस्थापनासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ९१५६०१००६०
फ्रोजन फूड व्यवसायातील संधी
अलीकडच्या काळामध्ये फ्रोजन फूडची खूप मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर या व्यवसायासंदर्भात माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा १९ जुलै रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत फ्रोजन फूड म्हणजे काय हे सांगून व्हेजिटेबल टिक्की, बर्गर टिक्की, नगेट्स, व्हेजिटेबल नगेट्स, चीज नगेट्स, चिकन टिक्की, चिकन नगेट्स, फ्रोजन चपाती, फ्रोजन पराठा, फ्रोजन स्वीट कॉर्न, फ्रोजन मटार, फ्रोजन पायनापल, फ्रोजन व्हेजिटेबल हे फ्रोजन पदार्थ तयार करण्याच्या व्यावसायिक पद्धती व प्रिझर्वेशन शिकवले जाणार आहे. तसेच फ्रोजन फूडसाठी लागणाऱ्या मशिनरी, प्रोजेक्ट रिपोर्ट, लोगो, शासकीय अटी, नियम व लायसन्स, कॉस्टिंग, लेबलिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि हा व्यवसाय कसा सुरू करावा याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.