सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

Published on

सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा ११, १२ व १३ जुलैला होणार आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १२ जुलैपासून सहा दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
संपर्क : ८४८४८११५४४

गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सॉफ्टवेअर कार्यशाळा
सोसायटीच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमतेचा वेग आणि डिजिटल सुलभता आणण्यासाठी खास हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कार्यशाळा १३ जुलै रोजी आयोजिली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना युजर मॅनेजमेंट, सदस्य डेटा व्यवस्थापन, मेंटेनन्स मॅनेजमेंट, कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या घटकांवर सखोल प्रशिक्षण दिले जाईल. तसेच ऑटो रिसीप्ट जनरेशन आणि तत्काळ पेमेंट अलर्ट्स यांसारख्या स्मार्ट फिचर्सवरही भर दिला जाईल. हे सॉफ्टवेअर पूर्णतः जाहिरातमुक्त असून, सिक्युअर्ड क्लाऊड स्टोरेज व डेटा गोपनीयता ही याची खास वैशिष्ट्यं आहेत. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, मॅनेजिंग कमिटी सदस्य व सामान्य सदस्य यांच्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. डिजिटल युगात सोसायटी संचालन अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

औषधी वनस्पती लागवड ऑनलाइन कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षांत औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा १४ जुलैपासून आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४

एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com