रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम वेबिनार
रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम वेबिनार
रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य, भरपूर पैसे व नाव कमवायची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच आयुष्यभर स्थिर व्यवसाय हवा आहे, अशा सर्वांसाठी रिअल इस्टेट मेंटॉरशिप प्रोग्रॅम १४ जुलैपासून सुरू होत आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत किंवा वयाची अट नाही. तीन महिन्यांचा हा प्रोग्रॅम क्लासरूम व ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून होणार आहे. स्थिर व भरपूर पैसे देणाऱ्या करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श आणि परिपूर्ण असे हे प्रशिक्षण असणार आहे. या संपूर्ण प्रशिक्षणासंदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य वेबिनार ११ जुलै रोजी सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७१
हेल्दी सूप कार्यशाळा
चालू पावसाळ्यात रेस्टॉरंट स्टाइल सूप स्वच्छ व आरोग्यदायी पद्धतीने कसे तयार करावे हे शिकवणारी कार्यशाळा १२ जुलै रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत टोमॅटो सूप, मोरिंगा सूप, ड्रायफ्रूट सूप, मिलेट सूप, नाचणी सूप, ब्रोकोली विथ क्रीम सूप, कॅप्सिकम कोथिंबीर सूप, मंचाव सूप, पमकीन सूप, मिक्स व्हेज सूप, पालक सूप, मशरूम सूप, अवाकाडो सूप, पीनट विथ क्रीम सूप, स्प्राउट्स सूप, रागी गार्लिक सूप हे प्रकार शिकवण्यात येणार आहेत. कार्यशाळेदरम्यान सर्व सिक्रेट टिप्स व ट्रिक्स सहभागींना सांगितल्या जातील तसेच पीडीएफ नोट्स दिल्या जातील.
संपर्क : ८४८४८११५४४
किचन गार्डन कार्यशाळा
किचन गार्डनद्वारे भाजीपाला, सक्युलन्ट्स व कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडांची तसेच इतर फळझाडांची लागवड करता येते. रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला आणि शोभेची इतर झाडे घरच्या घरी कशी लावू शकतो, याविषयी सखोल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ जुलै रोजी आयोजिली आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, शिवाय वर्षभर बाग फुललेली कशी राखावी, बागेचे आर्थिक गणित कसे बसवावे, बागेचे नियोजन व डिझाइन, लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, रोपांची निवड, माती व मातीविरहित लागवड करण्याची पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण याविषयी माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणारे अनुभवी तज्ज्ञ कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
स्वतःच्या यूट्युब चॅनेलवरती अथवा इन्स्टाग्राम व इतर प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी तो रेकॉर्ड करणे व एडिट करणे गरजेचे आहे. अनेकदा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो, मात्र तो एडिट करताना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन १९, २० तसेच २६, २७ जुलै रोजी करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश व्हिडिओ एडिटिंग कौशल्यांसह सहभागींना सक्षम करणे हा आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीप या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४