व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा

Published on

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
पुणे, ता. १४ : चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे १९, २० तसेच २६, २७ जुलैला आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश व्हिडिओ एडिटिंग कौशल्यांसह सहभागींना सक्षम करणे हा आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीपा या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, इस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कॉन्ट्रॅक्टर, विद्यार्थ्यांना उपयुक्त असे प्रशिक्षण १९ व २० जुलैला आयोजिले आहे. यात पीडब्ल्यूडी, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, मेजरमेन्ट शीट, रेट तपासणी, चार्ट, इस्टिमेशन सॉफ्टवेअर व इस्टिमेशन बनविणे, तयार करणे, समाज मंदिर, सभामंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशा प्रकारची कामे व इस्टिमेशनबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
संपर्क : ९३५६९७३४२७

फ्रोजन फूड व्यवसायातील संधी
अलीकडच्या काळामध्ये फ्रोजन फूडची खूप मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर या व्यवसायासंदर्भात माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा १९ जुलैला आयोजिली आहे. यात फ्रोजन फूड म्हणजे काय?, हे सांगून व्हेजिटेबल टिक्की, बर्गर टिक्की, नगेट्स, व्हेजिटेबल नगेट्स, चीज नगेट्स, चिकन टिक्की, चिकन नगेट्स, फ्रोजन चपाती, फ्रोजन पराठा, फ्रोजन स्वीट कॉर्न, फ्रोजन मटार, फ्रोजन पायनापल, फ्रोजन व्हेजिटेबल हे फ्रोजन पदार्थ तयार करण्याच्या व्यावसायिक पद्धती व प्रिझर्वेशन शिकवले जाणार आहे. तसेच फ्रोजन फूडसाठी लागणाऱ्या मशिनरी, प्रोजेक्ट रिपोर्ट, लोगो, शासकीय अटी, नियम व लायसन, कॉस्टिंग, लेबलिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि हा व्यवसाय कसा सुरू करावा याविषयी सविस्तर माहिती देणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

लँडस्केप गार्डनिंग कार्यशाळा
घराच्या आजूबाजूला उपलब्ध जागेमध्ये आकर्षक लँडस्केप गार्डन तयार करण्यासाठी लागणारे ज्ञान, गार्डनचे प्रकार, तयार करण्याची तत्त्वे, डिझाइनची पद्धत तसेच झाडांची निवड, गार्डनमधील रस्ते, बॉर्डरला लावली जाणारी झाडे आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २६ व २७ जुलैला आयोजिली आहे. कार्यशाळेत लँडस्केप गार्डनिंगचा परिचय, गार्डनमध्ये झाडांच्या वेगवेगळ्या डिझाइन तयार करण्याच्या पद्धती, साइटचे मूल्यांकन व तयारी, लँडस्केपिंग टेक्निक्स, खत व पाणी नियोजन, देखभाल पद्धती, पर्यावरणविषयक विचार, क्लायंट कम्युनिकेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सुरक्षा आणि नियम, लँडस्केप गार्डनिंगमधील भविष्यातील ट्रेंड आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com