‘झेड ब्लॅक’च्या यशोगाथेचा ‘हॉर्वर्ड’मध्ये समावेश

‘झेड ब्लॅक’च्या यशोगाथेचा ‘हॉर्वर्ड’मध्ये समावेश

Published on

‘झेड ब्लॅक’च्या यशोगाथेचा ‘हॉर्वर्ड’मध्ये समावेश
भारतीय उद्योगविश्‍वासाठी अभिमानाची बाब
इंदूर, ता. १५ : उदबत्तीनिर्माण उद्योगातील आघाडीचा ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘झेड ब्लॅक’चा समावेश आता हॉर्वर्ड बिझनेस स्कूलच्या अभ्यासक्रमात ‘केस स्टडी’ म्हणून करण्यात आला आहे. भारतीय उद्योगविश्‍वासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. ‘झेड ब्लॅक’ची निर्मिती करणाऱ्या म्हैसूर डीप परफ्यूमरी हाउसची (एमडीपीएच) यशोगाथा यानिमित्ताने अभ्यासली जाणार आहे.
इंदूरमध्ये अत्यंत छोटेखानी स्वरूपात सुरू झालेला हा उद्योग २०२७ पर्यंत एक हजार कोटी रुपये उलाढाल असलेल्या उद्योगांच्या रांगेत स्थिरावणार आहे. अशा प्रकारचे यश मिळवणारा उदबत्ती क्षेत्रातील हा पहिला उद्योग ठरणार आहे. त्यामुळे हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये ‘एमडीपीएच’च्या यशस्वी प्रवासाचा अभ्यास केला जाणार आहे.
एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे प्रा. तुलसी जयकुमार यांनी ही यशोगाथा शब्दबद्ध केली आहे. न्यूयॉर्कच्या ‘फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये ती शिकवली जाणार आहे. ‘‘हॉर्वर्ड विद्यापीठातील अभ्यासक्रमात आमच्या उद्योगाचा होणारा समावेश हा आमच्या प्रवासातील मैलाचा दगड असून, भारतीय उद्योगजगताचा सन्मान आहे,’’ अशा शब्दांत ‘एमडीपीएच’चे संचालक अंकित अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नव्वदच्या दशकात प्रकाश अग्रवाल यांनी ‘एमडीपीएच’ची स्थापना केली. या कंपनीचा विस्तार आज ९.४ लाख चौरस फूट क्षेत्रावर झाला असून, रोज सुमारे १५ लाख ‘झेड ब्लॅक’ उदबत्तीचे पुडे विकले जातात. उदबत्तीची निर्यात ४५ हून अधिक देशांमध्ये होते. यामुळे चार हजारपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.

फोटो ः PNE25V31584

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com