शेतकरी कंपनी नोंदणी सेवा

शेतकरी कंपनी नोंदणी सेवा

Published on

शेतकरी कंपनी नोंदणी सेवा
केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन व मार्केटिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सिमासेस लर्निंगद्वारे (SIILC) राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध प्रकारच्या सेवा, मार्गदर्शन एक-खिडकी पद्धतीने उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यापैकी एक सेवा म्हणजे शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा. कंपनीची नोंदणी योग्य प्रकारे केली गेली, कंपनीचे नियम-पोटनियम हे सर्वसमावेशक, व्यापक व परिपूर्ण अभ्यासाने बनवले गेले, तर नोंदणीनंतरच्या सुरुवातीच्या काळातील व्यवसाय तसेच भांडवल उभारणीतील मर्यादा-अडचणी टाळणे शक्य होते. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याची पात्रताही तयार होत राहते. या पार्श्‍वभूमीवर सिमासेस लर्निंगने अनुभवी सीए, सीएस, कृषी व्यवसाय मार्गदर्शक यांच्या माध्यमातून शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा उपलब्ध केली आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१

‘एनजीओ’ची स्थापना, नोंदणी व कार्यपद्धती
राज्य व देशपातळीवर अनेक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली आहे. विविध कामांसाठी ‘एनजीओ’ना प्राधान्य दिले जात असल्याने याद्वारे विकास, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. अशा या स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, संस्थेची कामकाज पद्धती, सीएसआरचे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन अशा स्वयंसेवी संस्थांशी निगडित विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २६ व २७ जुलै रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत संस्था कशी स्थापन करावी, प्रशासकीय दस्तऐवजीकरण करण्याची पद्धत, धर्मादाय आयोग व इतर सरकारी विभागांशी संपर्क कसा साधावा, प्रस्ताव तयार करणे व सादर करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, वार्षिक ताळेबंद, अहवाल कसे तयार करावेत, एनजीओद्वारे शासकीय योजनांची अंमलबजावणी, संस्था नोंदणीनंतरची आवश्यक कागदपत्रे याविषयी मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

ई-कॉमर्समधील ड्रॉप शिपिंग बिझनेस मॉडेल
ई-कॉमर्समध्ये यशस्वी करिअर घडवायचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी ड्रॉपशिपिंग बिझनेस मॉडेल ही तीनदिवसीय कार्यशाळा २९ जुलैपासून आयोजिली आहे. ड्रॉप शिपिंग ही अशी पद्धत आहे जिथे कोणतीही इन्व्हेंटरी किंवा गोदामाची गरज न पडता तुम्ही ऑनलाइन स्टोअर चालवू शकता. फक्त योग्य उत्पादने, विश्वासार्ह पुरवठादार आणि परिणामकारक मार्केटिंगच्या सहाय्याने तुम्ही स्वतःचा व्यवसाय काही तासांत सुरू करू शकता. कार्यशाळेत तुम्हाला शून्य इन्व्हेंटरीतून स्वतःचा स्टोअर तयार करून प्रत्यक्ष व्यवसाय कसा सुरू करावा हे शिकविले जाईल. यामध्ये ड्रॉप शिपिंगचे सैद्धांतिक ज्ञान, शॉपिफाय वेबसाइट डेव्हलपमेंटचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि समाजमाध्यमांवर मार्केटिंग जाहिराती कशा तयार करायच्या याचं मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

व्यावसायिक दृष्टिकोनातून मोदक कार्यशाळा
महाराष्ट्राच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या उत्सवाची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. या काळात मोदकांची मागणी वाढलेली असते. या पार्श्वभूमीवर बाप्पांना आवडणारा मोदक सिक्रेट टिप्स व ट्रिक्ससह तयार करण्याची कृती प्रात्यक्षिकांसहित करून दाखवणारी व मोदक व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना तो कसा सुरू करावा याचे मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २७ जुलै रोजी आयोजिली आहे. यामध्ये मोदक व्यवसायातील संधी व त्यासाठी विविध प्रकारचे नावीन्यपूर्ण मोदक कसे तयार करावेत याचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. मोदक तयार करण्याची व्यावसायिक पद्धत, प्रिजर्वेशनच्या पद्धती, बाजारपेठेतील संधी, नफा, पॅकिंग, लेबलिंग आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेत खवा, मँगो, केशर, गुलकंद, पान, शुगर फ्री, चॉकलेट, खारे, ड्रायफ्रूट, तळणीचे व उकडीचे इत्यादी मोदकांचे प्रकार शिकवले जातील.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com