शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
पुणे, ता. २८ : स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा ३ ऑगस्टला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलिटी, गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इत्यादीसंदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करीत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश महारेराने दिला आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच ४ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन प्रशिक्षण
रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करण्याच्या क्षेत्रात यायचा विचार करीत असणाऱ्यांसाठी किंवा या क्षेत्रात काम करीत आहे, परंतु सुयोग्य पद्धतीची माहीत नाही अशांसाठी उपयुक्त असे प्रशिक्षण ११ ते २४ ऑगस्टदरम्यान होणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करून रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. प्रशिक्षण ऑनलाइन दोन आठवडे व एक दिवस प्रात्यक्षिक अशा स्वरूपात होणार आहे. सिव्हिल इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स व विद्यार्थी यांच्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे १० दिवस चालणारे ऑनलाइन प्रशिक्षण ११ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, निविदा प्रक्रियेला लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे यंत्रे व साहित्य नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.