आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
Published on

एसआयआयएलसी

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण

पुणे, ता. १४ : आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार (ता. १६) पासून सात दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात एक्झिम धोरण, इन्कोटर्मस, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजनांबाबत अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी कौशल्यापासून कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.

शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा रविवारी (ता. १७) आयोजिली आहे. यात निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

अभ्यंग व मसाज व्यावसायिक कार्यशाळा
आयुर्वेदिक अभ्यंग व मसाज उपचारांनी संधिवात, डोकेदुखी, मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, हृदय संबंधित आजार, त्वचेचे आजार, पचनासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. तज्ज्ञ व्यावसायिकांची गरज असणारी ही उपचार पद्धती शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी याबाबत व्यावसायिक दृष्टीतून मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा २२, २३ व २४ मे रोजी आयोजिली आहे. यात अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेल, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी व किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश महारेराने दिला आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच सोमवार (ता. १८) पासून सुरू होत आहे.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com