राजकीय नेतृत्व कार्यशाळा

राजकीय नेतृत्व कार्यशाळा
Published on

राजकीय नेतृत्व कार्यशाळा
पुणे, ता. ३० : राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याची इच्छा असणाऱ्या नवोदित उमेदवारांसाठी एक विशेष कार्यशाळा ६ व ७ सप्टेंबरला आयोजित केली आहे. सहभागी उमेदवारांना पक्ष संघटना, कार्यालयीन व्यवस्थापन, कार्यकर्ता संघटन व कार्यसंघ निर्मितीबाबत सखोल माहिती मिळेल. तसेच वृत्तपत्रे, टीव्ही माध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा प्रभावी वापर कसा करावा, हेही शिकवले जाईल. ही कार्यशाळा राजकीय प्रवास सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी अमूल्य संधी ठरेल. कार्यशाळेत प्रभावी राजकीय संभाषण आणि भाषण कौशल्य, जनसंपर्काचे तंत्र आणि मतदारांशी संवाद साधण्याचे मार्ग, मतदारसंघाचा सखोल अभ्यास, डेटा संकलन व विश्लेषण, सर्वेक्षणाचे प्रकार, त्याचे महत्त्व व निवडणुकीतील वापर, कॅम्पेन डिझाईन, कंटेंट क्रिएशन व सोशल मीडिया हाताळणी, बूथ लेव्हल मॅनेजमेंट, वॉर रूम उभारणी आणि टीम प्रशिक्षण या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४

शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी, महसूल
शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना इ. शेतजमीनविषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा इ. याविषयी माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा २६ सप्टेंबरला आयोजित केली आहे. यात तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाइन कसे मिळवावे, ऑनलाइन साधने कशी वापरावी इ.बद्दल रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. आपण जमीन मालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट असाल तर कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

रिअल इस्टेट मेंटॉरशिप प्रोग्रॅम
ज्या लोकांना रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य प्राप्त करायचे आहे, ज्यांना अतिशय श्रीमंत जीवनशैली जगण्याची इच्छा व स्थिर व्यवसाय हवा आहे, अशांसाठी तीन महिन्यांचा रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. महारेराची अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’तर्फे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत. करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श असे हे प्रशिक्षण असणार आहे. रिअल इस्टेट मास्टर ट्रेनर व या क्षेत्रातील अनेक प्रकाशित पुस्तकांचे तज्ज्ञ लेखक रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. प्रशिक्षणाचे प्रतिव्यक्ती शुल्क ५० हजार रुपये अधिक जीएसटी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com