

पुणे, ता. २१ : स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन, शेवगा निर्जलीकरण व्यवसाय संधी व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा २७ सप्टेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत आणि पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलिटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, शेवगा निर्यातीसाठी परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती आणि कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम, निर्जलीकरण व्यवसायासाठीची यंत्रणा आदींसंदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
वास्तुशास्त्र कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस किंवा दुकान कसे असावे आदींबाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १, २ व ३ ऑक्टोबरला आयोजिली आहे. घर वास्तुदोषमुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे आणि कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तूचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.