

एसआयएलसी
निर्यात व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा
पुणे, ता. ३१ : स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा ८ फेब्रुवारीला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
यूट्युब-इन्स्टाग्रामसह वाढवा व्यवसाय
स्वतःचा उद्योग, व्यवसाय, व्यापार पुढील स्तरावर नेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असणारी ऑनलाइन कार्यशाळा ९ व १० फेब्रुवारीला आयोजिली आहे. कार्यशाळेत स्वतःच्या उद्योग-व्यवसायाचा ब्रँड वाढवण्यासाठी यूट्युब आणि इन्स्टाग्राम कसे वापरायचे, प्लॅटफॉर्म अल्गोरिदम, ट्रेंड आणि सामग्री निर्मिती (कन्टेन्ट क्रिएशन) समजून घेऊन शूटिंग, संपादन (एडिटिंग) आणि अपलोडिंग कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादन टॅगिंगद्वारे पैसे कसे कमवायचे आणि ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवायची, विविध यशोगाथा आणि भविष्यातील ट्रेंडपासून प्रेरणा कशी घ्यायची याबाबतही उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. स्वतःच्या व्यवसायाची ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भरभराट करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी मिळवून देणारी ही कार्यशाळा असणार आहे.
आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारीपासून ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात एक्झिम धोरण, इन्को टर्मस, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजनांवर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
गरजू विद्यार्थ्यांसाठी
सवलतीत कौशल्य प्रशिक्षण
शहरातील गरजू व बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ‘एसआयआयएलसी’ने सवलतीत दोन महिन्यांचा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या प्रशिक्षणासोबत प्रमाणपत्र आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून, युवक-युवतींना करिअरची दिशा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत ‘सप्लाय चेन व लॉजिस्टिक्स व्यवस्थापन’ तसेच ‘प्रोफेशनल बॅंक ऑफिस व कार्यालयीन प्रशासन’ हे दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. सध्याच्या उद्योगविश्वात या दोन्ही क्षेत्रांना मोठी मागणी असून प्रशिक्षित मनुष्यबळासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. तांत्रिक प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. यामध्ये इंग्रजी संभाषण कौशल्य, एमएस ऑफिस, अॅडव्हान्स एक्सेल, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत प्रशिक्षण तसेच नोकरी मार्गदर्शनाचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी पात्र ठरणार नाहीत, तर आत्मविश्वासाने मुलाखतींना सामोरे जाण्यास सक्षम होतील. या प्रशिक्षणासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असून वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे आहे. मर्यादित शुल्कात उपलब्ध असलेला हा कार्यक्रम बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे.
संपर्क : ७७५८९२४२७७, ९०२८९५४४२९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.