एसआयआयएलसी
एसआयआयएलसी
आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. ३ : आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारीपासून ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०, २१ व २२ फेब्रुवारीला होणार आहे. यात सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
AI आधारित बिझनेस अॅनालिसिस कार्यशाळा
आजच्या डिजिटल युगात डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा प्रभावी वापर करून व्यवसाय निर्णय अधिक अचूक आणि जलद घेता येत आहेत. याच पार्श्वभूमीवर AI आधारित बिझनेस अॅनालिसिसवरील ६० तासांची ऑनलाइन विशेष प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत पारंपरिक बिझनेस अॅनालिसिस आणि AI आधारित अॅनालिसिसमधील फरक स्पष्ट केला जाणार आहे. डेटा संकलन, विश्लेषण, ट्रेंड ओळखणे, अंदाज (Forecasting), निर्णय प्रक्रिया आणि व्यवसाय धोरण आखणीसाठी AI टूल्सचा कसा वापर करायचा, यावर सविस्तर मार्गदर्शन दिले जाईल. तसेच मार्केट अॅनालिसिस, ग्राहक वर्तन समजून घेणे, खर्च-नफा विश्लेषण, रिस्क मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स मोजमाप यासाठी AI कसा उपयुक्त ठरतो, हे प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजावले जाणार आहे. कार्यशाळेमुळे सहभागींची विश्लेषण क्षमता वाढेल, डेटा-आधारित निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि करिअर तसेच व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७. क्यूआर कोड : PFA
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

