

पुणे, ता. ४ : शहरातील घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीत स्वतःचा भाजीपाला पिकवण्याची आवड असणाऱ्यांसाठी किचन गार्डनिंग ही विशेष तीनदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मर्यादित जागेत हिरवीगार बाग फुलवताना योग्य नियोजन, मातीची निवड, लागवड आणि झाडांची निगा कशी राखावी, याचे तांत्रिक मार्गदर्शन या कार्यशाळेत मिळणार आहे. कार्यशाळा ५, ६ व ७ नोव्हेंबरला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे. कार्यशाळेत किचन गार्डनचे विविध प्रकार, बागेचे नियोजन आणि लागवडीपूर्वीची तयारी यांची माहिती दिली जाईल. भाजीपाला आणि शोभेच्या झाडांची निवड, माती व सेंद्रिय खतांचे योग्य नियोजन, तसेच कुंड्या आणि वाफे भरण्याच्या शास्त्रोक्त पद्धती शिकवल्या जातील. झाडांची चांगली वाढ होण्यासाठी योग्य पद्धतीने लागवड कशी करावी, यावरही भर दिला जाणार आहे. रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय पद्धतीने कीड व रोगांचे नियंत्रण कसे करावे, याचे मार्गदर्शनही प्रशिक्षणात केले जाईल. यासोबतच प्रत्यक्ष फील्ड व्हिजिटच्या माध्यमातून किचन गार्डनिंगमधील तंत्रांचा अनुभव घेता येणार आहे. घरच्या घरी ताजा भाजीपाला पिकवू इच्छिणारे, बागकामाची आवड असणारे तसेच टेरेस किंवा बाल्कनीचा योग्य वापर करून छोटी बाग विकसित करू पाहणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
‘ज्युनिअर आंत्रप्रेन्युअर’ कार्यशाळा
उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय सुरू करणे नव्हे, तर नव्या संधी ओळखणे, समस्यांवर उपाय शोधणे आणि कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देणे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच हे गुण विकसित व्हावेत, या उद्देशाने १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनिअर आंत्रप्रेन्युअर’ ही विशेष कार्यशाळा ७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. आजच्या तंत्रज्ञानाधारित आणि स्पर्धात्मक युगात उद्योजकीय विचारसरणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि स्टार्टअप क्षेत्राची प्राथमिक ओळख करून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे, यावर कार्यशाळेत भर दिला जाणार आहे. यामध्ये उद्योजकीय मानसिकता म्हणजे काय, व्यवसायाच्या नव्या संधी कशा ओळखाव्यात, स्टार्टअप सुरू करण्याची प्रक्रिया कोणती आणि त्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक असतात, याविषयी मार्गदर्शन केले जाईल. तसेच व्यवसायासाठी योग्य रणनीती आखणे, समस्या सोडवणे आणि आपल्या व्यवसायाची कल्पना प्रभावीपणे सादर करणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबीही शिकवल्या जातील. भविष्यात स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.