

एसआयआयएलसी
प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. १७ : प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी २५ व २६ एप्रिलला प्रशिक्षण आयोजिले आहे. सुरक्षा सेवांची वाढती गरज लक्षात घेता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रशिक्षणात प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी (PSARA) कायद्याची सविस्तर माहिती, लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच मॅनपॉवर व्यवस्थापन, सिक्युरिटी गार्ड्सची निवड व प्रशिक्षण, तसेच कार्यक्षम टीम उभारण्याच्या पद्धती, व्यवसायाचे कॉस्टिंग, सेवा दर ठरवणे, क्लायंट मिळवण्याच्या प्रभावी युक्त्या, मार्केटिंग तंत्र आणि व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक धोरणे यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
जमीन गुंतवणूक व्यवसायाबाबत मार्गदर्शन
जमिनीचे भाव हे सर्वत्र आणि सतत वाढत असल्याने म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर्स यांसारख्या गुंतवणुकीपेक्षा जमिनीतील गुंतवणूक जास्त फायद्याची ठरते. गुंतवणूक पर्याय म्हणून जमिनीकडे कसे बघावे व त्यातून पैसा कसा उभारावा, यासंदर्भात मार्गदर्शन २६ एप्रिलला आयोजिले आहे. कार्यशाळेत जमिनीची मूलभूत माहिती, प्रकार, क्षेत्र आणि दस्तऐवजीकरण, स्पर्धक विश्लेषण आणि बाजार संशोधन, जमीन शोधणे व त्याचे नियोजन, बँकिंग आणि वित्त (निधी), विकास आणि विपणन, मालमत्ता व्यवस्थापन आदी विषयांवर रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोट्स दिल्या जातील आणि १००% व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा २७ ते ३० एप्रिलदरम्यान आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगएवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी हे डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे, तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंग कसे करावे, याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे.
संपर्क : ७३५०००१६०३, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२
आरओसी कम्प्लायन्सेस
सवलत योजनेबाबत मार्गदर्शन
भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत स्थापित झालेल्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीने (एफपीसी) दरवर्षी कंपनी निबंधक कार्यालयाकडे (आरओसी) अनुपालन प्रक्रिया पूर्ण करावयाची असते. ही प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण केली नाही, तर या एफपीसीवर तसेच संचालकांवर आर्थिक दंड ठोठावला जातो. केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) प्रलंबित वार्षिक अनुपालन व इतर अनुपालनविषयक नियमांची पूर्तता करण्यासाठी सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. ‘कंपनी अनुपालन सुविधा योजना, २०२६ (CCFS-२०२६)’ या योजनेअंतर्गत १५ जुलै २०२६ पर्यंत सवलतीच्या दंड दरामध्ये कंपन्यांना अनुपालन पूर्ण करता येणार आहे. याबाबत मार्गदर्शन करणारे ऑनलाइन सत्र २८ एप्रिलला आयोजिले आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१, ८९५६७१२६३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.