

प्रगत बांधकाम पर्यवेक्षक प्रशिक्षण
पुणे, ता. ५ : स्थापत्य अभियांत्रिकीची पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर ३० दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण १३ एप्रिलपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देणार आहे. बांधकाम क्षेत्र व बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीन दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशनने १७, १८ व १९ एप्रिलला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल, बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल, वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा २७ ते ३० एप्रिलदरम्यान आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर डिजिटल मार्केटिंगएवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकासह कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४,९९९ अधिक जीएसटी.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०३