

एसआयआयएलसी
महारेरा परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
पुणे, ता. ११ : महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (MahaRERA)अंतर्गत रिअल इस्टेट एजंट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती १ एप्रिलपर्यंत खुली राहणार आहे. ज्या उमेदवारांनी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांनी तत्काळ परीक्षा अर्ज प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करूनही मागील टप्प्यात परीक्षा अर्ज भरू न शकलेले उमेदवारही आता अर्ज करू शकतात. महारेरा परीक्षेसाठी २० तासांचे अधिकृत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे सहभागी सध्या प्रशिक्षण घेत आहेत, त्यांनी परीक्षा अर्ज प्रक्रिया बंद होण्यापूर्वी आपले प्रशिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या सुरुवातीस विलंब होणार नाही. प्रशिक्षण व परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन लवकरच दिले जाणार असून, महारेरा अधिकृत प्रशिक्षणासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा. प्रशिक्षणासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०३
ई-कॉमर्समधील ड्रॉप शिपिंग बिझनेस मॉडेल
ई-कॉमर्समध्ये यशस्वी करिअर घडवायचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी खास आयोजिलेली ड्रॉपशिपिंग बिझनेस मॉडेल ही ऑनलाइन कार्यशाळा १६ मार्चपासून आयोजिली आहे. ड्रॉप शिपिंग ही अशी पद्धत आहे जिथे कोणतीही इन्व्हेंटरी किंवा गोदामाची गरज न पडता तुम्ही ऑनलाइन स्टोअर चालवू शकता. फक्त योग्य उत्पादने, विश्वासार्ह पुरवठादार आणि परिणामकारक मार्केटिंगच्या साहाय्याने तुम्ही स्वतःचा व्यवसाय काही तासांत सुरू करू शकता. कार्यशाळेत तुम्हाला शून्य इन्व्हेंटरीतून स्वतःचे स्टोअर तयार करून प्रत्यक्ष व्यवसाय कसा सुरू करावा, हे शिकवले जाईल. यामध्ये ड्रॉप शिपिंगची माहिती, Shopify वेबसाईट डेव्हलपमेंटचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि सोशल मीडियावर मार्केटिंग जाहिराती कशा तयार करायच्या, याचे मार्गदर्शन होणार आहे.
शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा २९ मार्चला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, शेवगा निर्यातीसाठी परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ.संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.