मशरूम प्रक्रिया उद्योग कार्यशाळा

मशरूम प्रक्रिया उद्योग कार्यशाळा

Published on

सद्यःस्थितीत मशरूम उत्पादनाला वाढती मागणी, त्याचे नाशवंत स्वरूप आणि त्यातून मिळू शकणाऱ्या भरघोस नफ्याच्या संधी लक्षात घेऊन व्यावसायिक मशरूम प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. १०) आयोजिली आहे. मशरूम प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास शेतकरी व उद्योजकांना दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते, या उद्देशाने ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेमध्ये फ्रोझन मशरूम तयार करण्याची पद्धत, मशरूम प्रीझर्वेशन, डिहायड्रेशन तसेच मशरूम टिक्की, नगेट्स, सूप प्रीमिक्स, मशरूम प्रोटीन पावडर, वेफर्स, खाकरा, बिस्कीट, मशरूम पावडर, फ्लेवर्ड मशरूम इत्यादी उत्पादने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे शिकवली जाणार आहेत. यासोबतच मशरूम प्रक्रिया उद्योगातील नावीन्यपूर्ण संधी, बाजारातील मागणी, कच्चा माल व्यवस्थापन, पॅकेजिंगचे महत्त्व आणि उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ यांची शास्त्रशुद्ध माहिती दिली जाणार आहे. ही कार्यशाळा मशरूम उत्पादक, कृषी उद्योजक, स्वयंसहाय्यता गट आणि अन्नप्रक्रिया उद्योगात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी
प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी हा एक विशेष प्रकार आहे. सध्या कॅमेऱ्यातूनही प्रॉडक्ट्सचे वेगळेपण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून अधिक उठावदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचते. याबाबत मार्गदर्शन करणारे दोन दिवसांचे प्रशिक्षण १० व ११ जानेवारी रोजी आयोजिले आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचे प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. क्लासरूम प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व एडिटिंग प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती मिळेल. हे प्रशिक्षण नवीन लोकांसाठी तसेच इतर कोणत्याही व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायाला प्रोफेशनल लूक देण्यासाठी, ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.

डिजिटल मार्केटिंग व एआय तंत्रज्ञान कार्यशाळा
डिजिटल युगातील वाढती संधी लक्षात घेऊन ‘डिजिटल मार्केटिंग व एआय तंत्रज्ञान’ या विषयावरील ऑनलाइन कार्यशाळा शनिवार (ता. १७)पासून सुरू होत आहे. डिजिटल मार्केटिंगसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शिकवून सहभागींच्या करिअरला नवी दिशा देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. आजच्या स्पर्धात्मक काळात डिजिटल मार्केटिंग आणि एआय ही सर्वाधिक मागणी असलेली कौशल्ये मानली जात असून ही कार्यशाळा विद्यार्थी, नोकरी शोधणारे युवक, व्यावसायिक उद्योजक यांच्यासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेत ग्राफिक डिझाइन, सोशल मीडिया मार्केटिंग (फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डइन), गुगल अ‍ॅड्सद्वारे जाहिरात, वेबसाईट तयार करणे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तसेच विविध एआय टूल्सचा प्रभावी वापर शिकवला जाणार आहे. एकूण ३५ पेक्षा अधिक मॉड्युल्सद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यानंतर सहभागींसाठी इंडस्ट्री-रेडी डिजिटल स्किल्स, एआय आधारित प्रॅक्टिकल ट्रेनिंग, प्रमाणपत्र तसेच नोकरी व करिअर संधींसाठी मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com