सकाळ कनेक्ट

सकाळ कनेक्ट

Published on

चाळीस प्रकारच्या चहाची व्यवसाय संधी
पुणे, ता. २१ ः कुठल्याही ब्रँडचा आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर चहा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ४० प्रकारच्या चहाचे प्रशिक्षण २८ फेब्रुवारी व १ मार्चला आयोजित केले आहे. यामध्ये चहाचे ४० प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील तसेच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊन ऑनलाइन व्यावसायिक चहाविक्री कशी करायची, चहा क्षेत्रात स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा, चहाची विक्री कशी वाढवायची, याबाबत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणानंतर थेट व्यवसाय उभे करण्याची व स्वतःच्या कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांची चहाविक्री वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.

‘एनजीओ’ नोंदणीबाबत प्रशिक्षण
स्वयंसेवी संस्थेची स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, संस्थेची कामकाज पद्धती, ‘सीएसआर’चे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन, अशा स्वयंसेवी संस्थांशी निगडित माहिती देणारे प्राथमिक प्रशिक्षण २८ फेब्रुवारीला, तर प्रगत प्रशिक्षण १ मार्चला आयोजित केले आहे. यात संस्थेची स्थापना कशी करावी, प्रशासकीय दस्तऐवजीकरण करण्याची पद्धत, धर्मादाय आयोग आणि इतर सरकारी विभागांशी संपर्क कसा साधावा, प्रस्ताव तयार करणे व सादर करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, वार्षिक ताळेबंद, अहवाल कसे तयार करावेत, ‘एनजीओ’द्वारे शासकीय योजनांची अंमलबजावणी, संस्था नोंदणीनंतरची आवश्यक कागदपत्रे इत्यादीविषयी मार्गदर्शन होईल.

‘सुपर ॲग्री-बिझनेस २०२६’ प्रशिक्षण
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅमअंतर्गत या प्रशिक्षणात फूड प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन, ॲग्री-स्टार्टअप व सेवा आधारित उच्च नफा देणाऱ्या शेती व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये कमी जमिनीत जास्त उत्पन्न देणारी स्क्वेअर इंच फार्मिंग संकल्पना, स्मार्ट व शाश्‍वत शेती पद्धती, ई-कॉमर्सद्वारे थेट विक्री, ब्रँडिंग व पॅकेजिंग तसेच पीएमएफएमई, एआयएफ व नाबार्ड योजनांमधील अनुदान व कर्ज मार्गदर्शन यावर माहिती दिली जाणार आहे. हे प्रशिक्षण २८ फेब्रुवारीला आयोजित केले आहे.

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे इत्यादींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २८ फेब्रुवारीला आयोजित केली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवर उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील, जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन होईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

(एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com