राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग : दीडशेहून अधिक दिवसांची प्रतीक्षा संपली
पुणे, ता. २७ : ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ होऊन साधारण १०५ दिवसांहून अधिक काळ लोटला. निकाल जाहीर न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. विद्यार्थ्यांच्या अस्वस्थतेला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संथ कारभारावर ‘सकाळ’ने वाचा फोडली होती. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेऊन आयोगाने अखेर पूर्व परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला.
आयोगाने ९ नोव्हेंबर २०२५ला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली; मात्र तीन महिने उलटूनही निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम होता. तसेच २९ मार्चला मुख्य परीक्षा नियोजित असल्याने निकाल उशिरा लागल्यास मुख्य परीक्षेच्या सखोल तयारीसाठी आवश्यक असलेले न्याय्य दिवस मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताणदेखील वाढला होता. ‘यूपीएससी’च्या धर्तीवर नव्याने लागू झालेल्या वर्णनात्मक अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी किमान ९० दिवसांचा वेळ मिळणे अपेक्षित असते; परंतु निकालाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या हाती केवळ महिना-दीड महिनाच उरल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष होता.
मुख्य परीक्षेसाठी केवळ ३० दिवस
आयोगाने जरी निकाल जाहीर केला असला, तरी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी मिळतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘यूपीएससी’च्या धर्तीवर नव्याने लागू झालेल्या वर्णनात्मक अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी किमान ९० दिवसांचा वेळ मिळणे अपेक्षित असते. त्यामुळे आयोगाच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
परीक्षेबाबत
- मुख्य परीक्षेचा कालावधी : २९ मार्च ते २६ एप्रिल
- अर्ज भरण्याचा कालावधी : २८ फेब्रुवारी ते १४ मार्च
- परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : १४ मार्च (ऑनलाइन पद्धतीने) आणि १७ मार्च (बँक चलनाद्वारे)
- परीक्षा केंद्रे : पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

