एसआयआयएलसी
एसआयआयएलसी
हाउसकिपिंग व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. १५ : हाउसकिपिंग सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यावसायिक सेवा व स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी २१ व २२ मार्च रोजी हाउसकिपिंग व्यवसाय प्रशिक्षण आयोजिले आहे. या प्रशिक्षणामध्ये हाउसकिपिंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, प्रत्यक्ष कामाचे तंत्र आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कौशल्यांचे सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. हाउसकिपिंग क्षेत्राची ओळख, वापरली जाणारी साधने व उपकरणे यासोबतच सॉफ्ट स्किल्स, ग्राहक संवाद यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच हाउसकिपिंग व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, टेंडर प्रक्रिया, कोटेशन व प्रस्ताव तयार करण्याची पद्धत, मार्केटिंग व ग्राहक मिळविण्याचे मार्ग समजावून सांगितले जातील. गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक टिकवून ठेवण्याची तंत्रे आणि व्यवसाय वाढ व कमाईचा आराखडा यावरही मार्गदर्शन होणार आहे.
औषधी वनस्पती लागवड ऑनलाइन कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २६ मार्च रोजी आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
सरकारी बाजारपेठ (जीईएम पोर्टल) प्रशिक्षण
सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करत आलेल्या विविध वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी एक ई-बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. या पोर्टलवर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था यांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तू यांची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारातील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी आरंभापासून अखेरपर्यंत ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय प्रशिक्षण २७ व २८ मार्च रोजी आयोजिले आहे.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
क्यूआर कोड : PFA

