सरकारी बाजारपेठ प्रशिक्षण
एसआयआयएलसी
सरकारी बाजारपेठ प्रशिक्षण
पुणे, ता. २२ : सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करीत आलेल्या विविध वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी एक बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. यावर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्थांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तूंची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारातील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी आरंभापासून अखेरपर्यंत ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबत मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय प्रशिक्षण २७ व २८ मार्चला आयोजिले आहे.
डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ४ एप्रिलला आयोजिले आहे. यात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, जागेची निवड, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
स्वीय सहाय्यक प्रशिक्षण
लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यक म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण ४ आणि ५ एप्रिलला आयोजिले आहे. प्रशासनाशी समन्वय, मतदारसंघ व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधींच्या दैनंदिन कामकाजात सहाय्य करण्यासाठी लागणाऱ्या विविध बाबींवर या प्रशिक्षणात सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणात स्वीय सहाय्यकाचे महत्त्व, संधी व आव्हाने, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, विधिमंडळ कामकाजाची माहिती, मतदारसंघाचा अभ्यास व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय सोशल मीडियाचा प्रभावी वापर, शासन व प्रशासनाशी संपर्क व समन्वय, शासकीय व अशासकीय योजनांची माहिती, वेळेचे नियोजन तसेच लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा यांचा सखोल आढावा घेतला जाईल. हे प्रशिक्षण पदवीधर उमेदवार, एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, राजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तसेच सार्वजनिक प्रशासनात रस असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

