

पुणे, ता. २९ : भारतीय उत्पादनांना परदेशात मिळणारी वाढती मागणी आणि देशांतर्गत बाजारपेठेत आयात उत्पादनांना असलेली पसंती यामुळे आयात-निर्यात व्यवसायात नव्या संधी निर्माण होत आहेत, मात्र या व्यवसायातील प्रक्रिया, नियम आणि कागदपत्रांची पुरेशी माहिती नसल्याने अनेक व्यापारी आणि नवउद्योजक या संधींचा लाभ घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ‘आयात-निर्यात व्यापार व्यवस्थापन’ या विषयावर १४ नोव्हेंबरला एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित केले आहे. यात आयात-निर्यातीच्या मूलभूत अटी, प्रमुख संकल्पना, व्यापार प्रक्रिया आणि निर्यात सुरू करण्यापूर्वी करावी लागणारी तयारी याविषयी मार्गदर्शन केले जाईल. निर्यात विपणन योजना तयार करणे, पेमेंट टर्म्स, इन्कोटर्म्स, कागदपत्रे आणि परदेशी ग्राहकांशी व्यावसायिक वाटाघाटी करण्याची कौशल्ये यांचाही समावेश असेल. याशिवाय उत्पादनांचे व्यवस्थापन, पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड आणि शासनाच्या विविध निर्यात योजनांची माहिती दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील बदलत्या परिस्थितीचा व्यवसायासाठी उपयोग कसा करून घ्यावा, यावरही प्रशिक्षणात भर असेल. निर्यातदारांसाठी उपयुक्त डिजिटल साधने, भूराजकीय घडामोडींचा व्यापारावर होणारा परिणाम, कंटेनर व्यवस्थापन आणि मालवाहतुकीचे दर यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयात-निर्यात क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणारे नवउद्योजक, व्यापारी तसेच आपल्या व्यवसायाचा विस्तार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करू पाहणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
शेतजमीन कायदे, हक्क,
नोंदणी अन् महसूल कार्यशाळा
शेतजमीनविषयक कायदे, कागदपत्रे आणि महसूल प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्यामुळे जमीन व्यवहारांमध्ये अनेकदा आर्थिक नुकसान व फसवणुकीला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी व महसूलविषयक कार्यशाळेचे आयोजन १५ नोव्हेंबरला केले आहे. या कार्यशाळेत ७/१२ उतारा, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना आदी कागदपत्रे कशी वाचायची, त्यांचा उपयोग कसा करायचा, शेतजमिनीचे विविध प्रकार, जमीन खरेदी-विक्रीचे नियम, संबंधित कायदे व महारेरा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच तलाठी व तहसील कार्यालयाशी संबंधित दस्तऐवज ऑनलाइन कसे मिळवायचे आणि उपलब्ध ऑनलाइन साधनांचा वापर कसा करायचा, याची माहिती दिली जाणार आहे. जमीन मालक, गुंतवणूकदार आणि प्रॉपर्टी एजंट यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या या कार्यशाळेत मूलभूत माहितीच्या माध्यमातून जमीन व्यवहारातील चुका, आर्थिक नुकसान आणि संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळणार आहे. रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड हे कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोट्स दिल्या जातील आणि १०० टक्के व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.