

यूट्युब कंटेंट क्रिएटर होण्याची संधी
पुणे, ता. ६ : ‘यूट्युब कंटेंट क्रिएटर विथ एआय’ ही चार दिवसांची कार्यशाळा १४, १५ आणि २१, २२ नोव्हेंबरला होणार आहे. ज्यांना यूट्युब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत, त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत यूट्युबद्वारे कमाई कशी करता येते, याबद्दल संपूर्ण माहिती, स्वत:चे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये एआयचा रोल व कंटेंट निर्मितीसाठी कोणती एआय साधने वापरावीत याचे उपयुक्त मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
‘स्क्रिप्ट रायटिंग आणि स्क्रीनप्ले रायटिंग’ कार्यशाळा
चित्रपटासाठी कल्पनेचे प्रभावी कथेत आणि कथेचे पटकथेत रूपांतर करण्याचे तंत्र शिकवणारी ‘स्क्रिप्ट रायटिंग आणि स्क्रीनप्ले रायटिंग’ ही तीनदिवसीय विशेष कार्यशाळा १६, १७ व १८ नोव्हेंबरला होणार आहे. यात चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया, आशयनिर्मिती, कथेचा विकास, सिनेमॅटिक दृश्यभाषा, स्क्रीनप्लेची रचना, प्रसंगांची मांडणी, व्यक्तिरेखांची जडणघडण आणि थ्री-ॲक्ट स्ट्रक्चर याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिके आणि असाइनमेंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष पटकथा लेखनाचा सराव करून घेतला जाईल. त्यामुळे सहभागींना शिकलेल्या संकल्पनांचा लेखनात वापर करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी, शॉर्ट फिल्म निर्माते, असिस्टंट डायरेक्टर्स तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ म. यांच्या संयुक्त विद्यमाने २७, २८ व २९ नोव्हेंबरला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनातील वाढत्या रोजगारसंधी लक्षात घेता, सोसायटी व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.