

प्लॉटिंग व्यवसायात करिअरच्या संधी
पुणे, ता. ८ : रिअल इस्टेट क्षेत्रात प्लॉटिंग व्यवसाय सुरू करू इच्छिणारे, जमीन गुंतवणूकदार तसेच नवोदित उद्योजकांसाठी दोनदिवसीय ‘लँड डेव्हलपमेंट (प्लॉटिंग) व्यवसाय प्रशिक्षण’ २१ व २२ नोव्हेंबरला आयोजिले आहे. प्लॉटिंग व्यवसायाची प्रक्रिया उदाहरणांसह समजावून सांगण्यावर या प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे. यामध्ये योग्य जमीन कशी शोधावी, तिची कायदेशीर पडताळणी, खरेदी-विक्री व्यवहार सुरक्षितरीत्या कसे पूर्ण करावेत, तसेच जमीनमालकांशी प्रभावी संवाद साधण्याच्या तंत्राविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी व्यावसायिक नियोजन, जोखीम व्यवस्थापन आणि व्यवहारातील महत्त्वाच्या बाबींचाही ऊहापोह केला जाणार आहे. याशिवाय टाऊन प्लॅनिंग, प्लॉटिंगची विकास प्रक्रिया, प्रकल्प नियोजन, विक्री व विपणन कौशल्ये, गुंतवणूकदार आणि ग्राहक व्यवस्थापन तसेच व्यवसाय विस्तारासाठी धोरणांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. कमी जोखमीमध्ये यशस्वी प्लॉटिंग व्यवसाय उभारण्यासाठी व्यावहारिक ज्ञान या प्रशिक्षणातून दिले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
कंपनीचे उत्पादन किंवा सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत कमी खर्चात आणि अचूकपणे पोहोचवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा सर्वात परिणामकारक मार्ग ठरत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, दर्जेदार लीड्स मिळवणे आणि प्रकल्पांची प्रभावी प्रसिद्धी करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या पार्श्वभूमीवर खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित ऑनलाइन-ऑफलाइन (हायब्रीड) प्रशिक्षण २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजिले आहे. प्रशिक्षणामध्ये बांधकाम व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रभावी तंत्र, सर्च इंजिन मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग, गुगल बिझनेस प्रोफाइलचा प्रभावी वापर, फेसबुक व इन्स्टाग्राम जाहिराती, ग्राहक लीड जनरेशन, कंटेंट क्रिएशन, व्हिडिओ मार्केटिंग, एआय-आधारित मार्केटिंग साधने तसेच डिजिटल मोहिमांचे विश्लेषण याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
यूडीपीसीआर आणि मुंबई
डीसीपीआर २०३४ प्रशिक्षण
रिअल इस्टेटमधील भूखंडाची विकासक्षमता, एफएसआय, टीडीआर आणि पुनर्विकास प्रकल्पांची व्यवहार्यता समजून घेण्यासाठी विशेष ऑनलाइन मास्टर क्लासचे आयोजन ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणात महाराष्ट्रातील यूडीपीसीआर नियम, त्यांचे लागू क्षेत्र, बेसिक व प्रीमियम एफएसआय, टीडीआर गणना, सेटबॅक, मोकळ्या जागा, पार्किंग आणि प्रकल्प व्यवहार्यता यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मुंबई डीसीपीआर २०३४ मधील विकास नियंत्रण नियम, भूखंड विश्लेषण, अतिरिक्त विकास क्षमता, पुनर्वसन व विक्रीयोग्य क्षेत्र, बांधकाम परवानग्या आणि मंजुरी प्रक्रियांचे प्रत्यक्ष उदाहरणांसह विश्लेषण केले जाईल. मूल्यनिर्धारक, अभियंते, वास्तुविशारद, बिल्डर्स, विकसक, रिअल इस्टेट व्यावसायिक, सोसायटी पुनर्विकास समिती सदस्य आणि संबंधित विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.