

पुणे, ता. १७ : निर्जलीकरण उद्योगातील वाढत्या संधी लक्षात घेऊन २१ व २२ नोव्हेंबरला डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश शेतकरी, कृषी उद्योजक आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना निर्जलीकरण तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे हा आहे. प्रशिक्षणामध्ये निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व व उपयोग, तसेच हा व्यवसाय कसा उभारावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निर्जलीकरणासाठी लागणारे प्रमुख घटक, विविध पद्धती, उत्पादन प्रक्रिया, मशिनरी, फ्लो चार्ट, तसेच तयार होणाऱ्या उत्पादनांच्या बाजारमूल्याविषयी माहिती दिली जाईल. यासोबतच बाजारपेठेतील संधी, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्पासाठी जागा, गुंतवणूक आणि प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान फळभाज्या, पालेभाज्या, कंद, आयुर्वेदिक वनस्पती, फळे तसेच दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे व चिकन यांचे निर्जलीकरण प्रात्यक्षिकही दाखवले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
हाउसिंग सोसायटी मॅनेजर होण्याची संधी
गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी प्रशिक्षित सोसायटी मॅनेजर्सची गरज वाढत आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळावीत, यासाठी एसआयआयएलसी आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय ‘हाउसिंग सोसायटी मॅनेजर प्रमाणपत्र प्रशिक्षण’ आयोजित केले आहे. नोव्हेंबर बॅचसाठी नोंदणी सुरू झाली असून, हे प्रशिक्षण २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत पुण्यात होणार आहे. प्रशिक्षणात सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटीच्या बैठकीचा अजेंडा तयार करणे, मिनिट्स लेखन, शेअर्स व व्याज हस्तांतरण प्रक्रिया, देखभाल बिले तयार करणे आणि टीडीएस भरण्याविषयी मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय ऑडिटसाठी आवश्यक चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल, वार्षिक विवरणपत्रे, विविध रजिस्टर व फॉर्म्स, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभ्यास करता येईल. सोसायटी व्यवस्थापनासाठी सॉफ्ट स्किल्सवरही भर दिला जाणार आहे. महासंघाच्या अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण आणि शंकांचे निरसन केले जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.