व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स
भाजीपाला कार्यशाळा
Published on: 

पुणे, ता. १८ : व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा २१ व २२ नोव्हेंबरला आयोजिली आहे. शेतीसाठी उपलब्ध होत असलेली मर्यादित जमीन, पाण्याची टंचाई आणि रसायनमुक्त, दर्जेदार भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेता हायड्रोपोनिक्स हे आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञान म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. कमी जागेत, कमी पाण्याचा वापर करून वर्षभर उच्च दर्जाच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याची संधी या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होत आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती आदी विविध पिकांचे उत्पादन, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावीत, न्यूट्रिएंट सोल्युशन तयार करण्याची पद्धत, पीएच व ईसी नियंत्रण, प्रकाश, आर्द्रता आणि तापमानाचे व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व त्यावरील उपायांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

स्क्रिप्ट रायटिंगसह ‘स्क्रीनप्ले रायटिंग’ कार्यशाळा
चित्रपटासाठी कल्पनेचे प्रभावी कथेत आणि कथेचे पटकथेत रूपांतर करण्याचे तंत्र शिकवणारी ‘स्क्रिप्ट रायटिंग आणि स्क्रीनप्ले रायटिंग’ ही तीनदिवसीय विशेष कार्यशाळा २३, २४ व २५ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. यात चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, आशय निर्मिती, कथेचा विकास, सिनेमॅटिक दृश्यभाषा, स्क्रीनप्लेची रचना, प्रसंगांची मांडणी, व्यक्तिरेखांची जडणघडण आणि थ्री-ॲक्ट स्ट्रक्चर यांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिके आणि असाइनमेंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष पटकथा लेखनाचा सराव करून घेतला जाईल. त्यामुळे सहभागींना शिकलेल्या संकल्पनांचा लेखनात वापर करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी, शॉर्ट फिल्म निर्माते, सहाय्यक दिग्दर्शक तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.