

पुणे, ता. १८ : हिंदी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा सुरू असतानाही पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक तिकिटांची विक्री आणि दोन कोटींहून अधिक कमाईचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता चित्रपटाचे शोदेखील वाढवण्यात आले आहेत.
आजोबा आणि नातवाच्या नात्यातील भावनिक बंध, त्यांच्यातील मतभेद, संवाद, प्रेम आणि एकमेकांसाठी असलेली ओढ या सगळ्याची हृदयस्पर्शी मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि युवा लेखक-अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या अभिनयातील सहजता, त्यांच्यातील सुंदर ‘केमिस्ट्री आणि’ भावनिक प्रसंगांची प्रभावी मांडणी, ही वैशिष्ट्ये प्रेक्षकांना विशेष भावत आहेत. केवळ मनोरंजन न करता नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी कथा अनुभवायला देत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाविषयी समाज माध्यमांवर प्रेक्षक भरभरून व्यक्त देखील होत आहेत.
निर्माते समीर हंपी म्हणाले, पहिल्या आठवड्यात मिळालेले हे यश आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे चित्रपटाची घोडदौड सुरू असून वाढवण्यात आलेले शो आणि मिळणारा प्रतिसाद, यामुळे संपूर्ण चमूचा आनंद द्विगुणित झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रवींद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.