महारेरा परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

महारेरा परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Published on

महारेरा इस्टेट एजंट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
पुणे, ता. २६ : महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणा (महारेरा)अंतर्गत रिअल इस्टेट एजंट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती येत्या १ एप्रिलपर्यंत खुली राहणार आहे. ज्या उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांनी तत्काळ परीक्षा अर्ज प्रक्रिया करावी, असे आवाहन केले आहे. यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करूनही मागील टप्प्यात परीक्षा अर्ज भरू न शकलेले उमेदवारही आता अर्ज करू शकतात. महारेरा परीक्षेसाठी २० तासांचे अधिकृत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे सहभागी प्रशिक्षण घेत आहेत, त्यांनी परीक्षा अर्ज प्रक्रिया बंद होण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या सुरुवातीस विलंब होणार नाही. प्रशिक्षण व परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०३

सीएसआर प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीमधून त्यांना ही गरज भागवता येते; मात्र हा निधी कसा मिळवावा, यासाठीचे नियम व कायदे, संस्थेच्या प्रकल्प अहवालाबाबत अनेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर प्रशिक्षण २८ व २९ मार्चला आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर म्हणजे काय, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणीच्या प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.

अन्न सेवा उद्योगावर कार्यशाळा
अन्न सेवा (फूड सर्व्हिस) उद्योगात व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक, हॉटेल व रेस्टॉरंट मालक तसेच नवउद्योजकांसाठी विशेष कार्यशाळा ५ एप्रिलला आयोजिली आहे. यात हॉटेल, कॅफे, क्लाऊड किचन आणि ढाबा व्यवसायाचे नियोजन, ब्रँडिंग, जागेची निवड, कर्मचारी व्यवस्थापन तसेच किचन व फ्लोअर ऑपरेशन्स, तंत्रज्ञानाचा वापर, खर्चाचे नियोजन आणि शाश्वत व्यवसाय मॉडेल तयार करण्याविषयी मार्गदर्शन होणार आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करताना २१ महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती, क्लाऊड किचनची संकल्पना, तसेच स्विगी व झोमॅटो प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती, कमिशन संरचना, नफा वाढीच्या युक्त्या, फूड स्टॉल्स, ढाबा व कॅफेद्वारे स्थानिक पातळीवर प्रभावी व्यवसायाचे तंत्र, स्टाफिंग, किचन लेआउट, पीओएस प्रणाली, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि वित्तीय नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com