

पुणे, ता. ११ : जमिनीचे भाव हे सर्वत्र आणि सतत वाढत असल्याने म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर्स यांसारख्या गुंतवणुकीपेक्षा जमिनीतील गुंतवणूक जास्त फायद्याची ठरते. गुंतवणूक पर्याय म्हणून जमिनीकडे कसे बघावे आणि त्यातून पैसा कसा उभारावा, याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा १८ ऑक्टोबरला आयोजित केली आहे. कार्यशाळेत जमिनीची मूलभूत माहिती, प्रकार, क्षेत्र आणि दस्तऐवजीकरण, स्पर्धक विश्लेषण आणि बाजार संशोधन, जमीन शोधणे व त्याचे नियोजन, बँकिंग आणि वित्त (निधी), विकास आणि विपणन, मालमत्ता व्यवस्थापन इत्यादी विषयांवर रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोट्स दिल्या जातील आणि १०० टक्के व्यावहारिक ज्ञान, वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४
वास्तुशास्त्र कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इत्यादीबाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १९ व २० ऑक्टोबरला आयोजित केली आहे. घर वास्तुदोषमुक्त असावे, ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे, कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तूचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
जीएसटी अकाउंट असिस्टंट, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन
सकाळ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी आणि ईशान्य फाउंडेशन यांच्यातर्फे १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी जीएसटी अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयांचे विनामूल्य प्रशिक्षण २० ऑक्टोबरपासून आयोजिले आहे. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांत वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’ या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना नोकरीच्या ठिकाणी आवश्यक असणारी महत्त्वाची कौशल्ये जसे की संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी विषयांचेही मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी खात्रीशीर सहाय्य पुरवले जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी चाळ नंबर ८८/४, डांबर कोठी, पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे या प्रशिक्षण ठिकाणी भेट द्यावी.
संपर्क : ८६६८७६२२४०, ९०४९५४२७२५
व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा
व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा २४ व २५ ऑक्टोबरला आयोजिली आहे. शेतीसाठी उपलब्ध होत असलेली मर्यादित जमीन, पाण्याची टंचाई आणि रसायनमुक्त, दर्जेदार भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेता हायड्रोपोनिक्स हे आधुनिक, फायदेशीर तंत्रज्ञान म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. कमी जागेत, कमी पाण्याचा वापर करून वर्षभर उच्च दर्जाचा भाजीपाला उत्पादन घेण्याची संधी या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होत आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टीगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इत्यादी विविध पिकांचे उत्पादन, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावीत, न्यूट्रिएंट सोल्युशन तयार करण्याची पद्धत, pH व EC नियंत्रण, प्रकाश, आर्द्रता आणि तापमानाचे व्यवस्थापन, तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आणि त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.