दिवाळी फराळ व्यवसायासाठी विशेष मार्गदर्शन

दिवाळी फराळ व्यवसायासाठी विशेष मार्गदर्शन
Published on: 

पुणे, ता. १२ : दिवाळीच्या पारंपरिक फराळाला व्यावसायिक स्वरूप देऊन घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणारी ‘दिवाळी फराळ व्यवसाय संधी’ कार्यशाळा १७ व १८ ऑक्टोबरला होणार आहे. घरगुती पद्धतीने चविष्ट व आकर्षक फराळ तयार करण्यासोबत त्याची विक्री करून उत्पन्नाचे साधन कसे निर्माण करावे, याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे. रवा व बेसन लाडू, चकली, चिरोटे, करंजी, पुडाची वडी, शेव, बाकरवडी, विविध प्रकारचे चिवडे, शंकरपाळे आणि बालुशाही यांसह लोकप्रिय फराळाचे पदार्थ प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहेत. तसेच पदार्थांची गुणवत्ता व चव वाढवण्याच्या टिप्स, उत्पादन नियोजन, व्यवसायाची सुरुवात आणि विक्रीसाठी आवश्यक बाबी समजावून सांगितल्या जातील. तयार पदार्थांच्या सविस्तर नोट्सही देण्यात येणार असून, महिला, गृहिणी, बचत गट आणि नवउद्योजकांसाठी ही कार्यशाळा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

इन्स्टंट पिठे आणि फूड प्रीमिक्स व्यवसायाची संधी
धावपळीच्या जीवनशैलीमुळे इन्स्टंट खाद्यपदार्थांची मागणी वाढत असून, या क्षेत्रातील व्यावसायिक संधींची माहिती देणारी दोन दिवसीय कार्यशाळा २४ व २५ ऑक्टोबरला होणार आहे. पहिल्या दिवशी डोसा, इडली, ढोकळा, गुलाबजामून, रबडी, पोहे, उपमा, केक, पॅनकेक, थालीपीठ, चकली, पकोडा आणि वडा यांसारख्या पदार्थांचे इन्स्टंट पीठ व प्रीमिक्स तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल. दुसऱ्या दिवशी विविध ग्रेव्ही, करी, रस्से, कबाब, पास्ता आणि सूप प्रीमिक्स तयार करण्याचे तंत्र शिकवले जाईल. याशिवाय उत्पादनांची गुणवत्ता, कॉस्टिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी, परवाने आणि शासकीय अनुदान याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच व्यवसायाचा विस्तार करू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून, सहभागींना नोट्स व डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४


एक्सेल व एआयच्या मदतीने डेटा अ‍ॅनालिसिस कार्यशाळा
व्यवसायातील निर्णय अधिक अचूक आणि परिणामकारक घेण्यासाठी डेटा विश्लेषणाचे कौशल्य विकसित करणारी प्रात्यक्षिक कार्यशाळा ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला होत आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि एआयच्या सहाय्याने डेटा स्वच्छ करणे, त्याचे विश्लेषण करणे, आलेख व अहवाल तयार करणे आणि त्यातून उपयुक्त निष्कर्ष काढण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यशाळेत डेटा अ‍ॅनालिसिसची मूलभूत माहिती, डेटा क्लीनिंग, एक्सेलमधील महत्त्वाची सूत्रे व फंक्शन्स, सॉर्टिंग, फिल्टरिंग, फॉरमॅटिंग तसेच पिव्होट टेबल्स व पिव्होट चार्ट्‌सद्वारे मोठ्या डेटाचे विश्लेषण करण्याचे तंत्र शिकवले जाईल. याशिवाय चार्ट्‌स, डॅशबोर्ड व डेटा व्हिज्युअलायझेशन तयार करणे, एआयचा प्रभावी वापर आणि व्यावसायिक उदाहरणांवर आधारित सराव घेतला जाणार आहे. व्यावसायिक, व्यवस्थापक, उद्योजक, विद्यार्थी आणि व्यवसाय मालकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com