

पुणे, ता. १३ : शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना इत्यादी शेतजमीनविषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा याविषयी माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा १७ ऑक्टोबरला होणार आहे. यात तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाइन कसे मिळवावे, विविध ऑनलाइन उपलब्ध साधने कशी वापरावी, याबद्दल रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. आपण जमीनमालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट असाल, तर कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
वास्तुशास्त्र कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इत्यादींबाबत माहिती देणारी ऑनलाइन कार्यशाळा १९ व २० ऑक्टोबरला होणार आहे. घर, वास्तु दोषमुक्त असावी ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
जीएसटी अकाउंट असिस्टंट,
ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन कार्यशाळा
सकाळ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी आणि ईशान्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी जीएसटी अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयांचे विनामूल्य प्रशिक्षण २० ऑक्टोबरपासून होणार आहे. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’ या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना नोकरीच्या ठिकाणी आवश्यक असणारी महत्त्वाची कौशल्ये जसे की संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी विषयांचेदेखील मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी खात्रीशीर सहाय्य पुरवले जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी चाळ नंबर ८८/४, डांबर कोठी, पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे या प्रशिक्षण ठिकाणी भेट द्यावी.
संपर्क : ८६६८७६२२४०, ९०४९५४२७२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.