

सांधेदुखीवर आयुर्वेदाच्या
तत्त्वांवर आधारित उपचारपद्धती
पुणे, ता. ७ : सांधेदुखी आणि गुडघेदुखी ही समस्या आता केवळ वयस्कर व्यक्तींपुरती मर्यादित राहिलेली नाही. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, बदललेल्या आहाराच्या सवयी आणि ताणतणावामुळे अनेकांना सांधे, स्नायू आणि मणक्यांचे त्रास जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’तर्फे गेल्या ३९ वर्षांपासून सांधेदुखी, गुडघेदुखी आणि विविध स्नायूविकारांवर विनाशस्त्रक्रिया उपचार देत असल्याचे क्लिनिककडून सांगण्यात आले.
१९८८ मध्ये ढोले पाटील रस्त्यावरून टेबची सुरुवात झाली. डॉ. रुस्तम गिनिवाला आणि एका ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञाने सुमारे ११ वर्षे केलेल्या संशोधनातून ही उपचारपद्धती विकसित झाली असून, रुग्णाची प्रकृती, आजाराचा इतिहास, आहार, जीवनशैली आणि सांध्यांची स्थिती यांचा विचार करून प्रत्येकासाठी स्वतंत्र उपचारयोजना केली जाते. आमवात, अस्थिसंधिवात, मणक्यांचे विकार, गोठलेला खांदा, कोपरदुखी, स्नायूंचे विकार, तसेच अस्थिबंधन आणि कूर्चेच्या समस्यांवर उपचार केले जातात. आवश्यकतेनुसार रक्ततपासण्याही केल्या जातात, असे क्लिनिककडून सांगितले. टेबच्या उपचारांमध्ये वेदनाशामक औषधे, स्टेरॉईड किंवा इंजेक्शनचा वापर केला जात नाही. आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित वनस्पतिजन्य औषधांचा वापर केला जातो. उपचार प्रामुख्याने बाह्यरुग्ण पद्धतीने केले जातात. नागपूर आणि सुरत येथेही टेबची सेवा सुरू असून, रुग्णकेंद्री उपचारपद्धती आणि प्रदीर्घ अनुभव ही केंद्राची वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.