आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
Published on

पुणे, ता. १७ : जागतिकीकरणामुळे भारतीय उत्पादने जगभरातील बाजारपेठेत पोहोचविण्याच्या संधी वाढल्या असून, योग्य नियोजन आणि व्यावसायिक धोरणांच्या आधारे आयात-निर्यात व्यवसाय सुरू करता येतो. या पार्श्वभूमीवर सात दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ प्रशिक्षण १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान सुरू होणार आहे. प्रशिक्षणात आयात-निर्यात धोरण, आवश्यक नोंदणी व परवाने, आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक अटी, शिपिंग व कंटेनर व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, दररचना, पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच परदेशी ग्राहक व पुरवठादार शोधणे, बाजारपेठेचा अभ्यास, उत्पादनाची निवड, आंतरराष्ट्रीय वाटाघाटी, व्यवहारातील जोखीम व्यवस्थापन, कागदपत्रे, पेमेंट पद्धती, बँकिंग, कस्टम्स व शिपिंग प्रक्रिया यांची माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४

आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा २५, २६ व २७ सप्टेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, मसाज केव्हा, कधी किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

ॲग्रो टुरिझम व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण
शेतीला पर्यटनाची जोड देऊन उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करू इच्छिणाऱ्या शेतकरी, कृषी उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी दोनदिवसीय ‘ॲग्रो टुरिझम बिझनेस मॅनेजमेंट’ प्रशिक्षण २६ व २७ सप्टेंबरला आयोजिले आहे. प्रशिक्षणात ॲग्रो टुरिझमची संकल्पना, व्यवसायातील संधी, प्रकल्प उभारणी, योग्य थीम, कायदेशीर अनुपालन, परवाने, शासकीय मार्गदर्शक तत्त्वे, व्यवसाय नियोजन, उत्पन्नाचे मॉडेल आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कर्मचारी व्यवस्थापन, दैनंदिन कामकाज, ग्राहक अनुभव आणि आवश्यक पायाभूत सुविधांचे नियोजन शिकवले जाईल. शाश्वत बांधकामासाठी बांबूचा वापर, बांबू बांधकाम तंत्रे, लँडस्केप प्लॅनिंग, वृक्ष-वनस्पतींची निवड आणि मनोरंजन क्षेत्र विकास यावरही मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय यशस्वी ॲग्रो टुरिझम प्रकल्पाला क्षेत्रभेट देऊन प्रकल्प व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि उत्तम पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी सहभागींना मिळणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

Marathi News Esakal
www.esakal.com